पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओदिशातील बालनगीर येथील खासदार संगीता कुमारी सिंग देव यांनी कुपोषणाच्या समस्येची जनजागृती व जनसहभागाच्या माध्यमातून हाताळणी करण्यासंदर्भातल्या ट्विट मालिकेला प्रतिसाद दिला आहे.
सरकारने महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या पोषण अभियान अंतर्गत सुरु केलेल्या उपक्रमामुळे झालेल्या सकारात्मक परिणामांबद्दल बालनगीरच्या खासदारांनी या ट्विट थ्रेड मालिकेत माहिती दिली. या पोषण अभियानामुळे बालके आता जन्मतः च अधिक निरोगी व सुपोषित असतात अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांनी स्वच्छ भारत अभियानासाठी दिलेल्या हाकेला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला असून पंतप्रधानांच्या या आवाहनाशी लोक जोडले गेले असे त्या म्हणाल्या . सरकारने पोषण अभियानाची अंमलबजावणी प्रभावी पद्धतीने केल्यामुळे व त्याला जनतेकडून सक्रिय सहभाग मिळाल्यामुळे ते यशस्वी होत आहे असे त्या म्हणाल्या .
पंतप्रधानांनी त्यावर ट्वीट दिले -
“कुपोषणाची समस्या जनजागृती व जनसहभागातून सोडवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसंबंधात ही एक खूप विचारप्रवर्तक ट्वीट मालिका आहे.”
An interesting thread on tackling the menace of malnutrition through awareness and mass participation. https://t.co/h4pps4ACHh
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2023
ସଚେତନତା ଏବଂ ଜନ ଭାଗିଦାରୀ ଜରିଆରେ ଅପପୁଷ୍ଟି ସମସ୍ୟାର ନିୟନ୍ତ୍ରଣ ଏକ ଆକର୍ଷଣୀୟ ସୂତ୍ର । https://t.co/h4pps4ACHh
— Narendra Modi (@narendramodi) April 10, 2023


