स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे भरलेल्या जागतिक धर्म परिषदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणाच्या घटनेला 132 वर्षे पूर्ण झाल्याच्या पवित्र प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की तो एक असा निर्णायक क्षण होता ज्याने सुसंवाद आणि वैश्विक बंधुत्वावर अधिक भर दिला.ते पुढे म्हणाले की तो खरोखरीच आपल्या इतिहासातील सर्वात प्रसिध्द आणि प्रेरणादायक क्षणांपैकी एक होता.
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
1893 मध्ये आजच्याच दिवशी स्वामी विवेकानंद यांनी शिकागो येथे केलेले हे भाषण सर्वत्र एक निर्णायक घटना समजली जाते. सुसंवाद आणि वैश्विक बंधुत्वावर अधिक भर देत त्यांनी जागतिक मंचावर भारतीय संस्कृतीतील आदर्शांची चर्चा केली. तो खरोखरीच आपल्या इतिहासातील सर्वात प्रसिध्द आणि प्रेरणादायक क्षणांपैकी एक होता.
https://belurmath.org/swami-vivekananda-speeches-at-the-parliament-of-religions-chicago-1893/“
This speech by Swami Vivekananda, delivered in Chicago on this day in 1893, is widely regarded as a watershed moment. Emphasising harmony and universal brotherhood, he passionately spoke about the ideals of Indian culture on the world stage. It is truly among the most celebrated…
— Narendra Modi (@narendramodi) September 11, 2025


