नि:स्वार्थ भावनेने केलेले काम, हेच मानवतेचे खरे रूप आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. अशा कामांमुळे केवळ आंतरिक आनंदच लाभत नाही, तर समाजाच्या कल्याणालाही हातभार लागतो, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे-
“अद्रोहः सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा।
अनुग्रहश्च दानं च शीलमेतत्प्रशस्यते॥”
कोणत्याही जीवाविषयी द्वेष भाव न बाळगणे, मग ते विचाराने असो, शब्दाने असो, की कृतीने असो. सर्वांशी करुणेने वागणे आणि उदारपणे देत राहणे, हेच आचरणाचे सर्वोच्च स्वरूप मानले जाते, असा संदेश हे सुभाषित देते.
पंतप्रधानांनी एक्स वर लिहिले आहे:
“नि:स्वार्थ भावनेने केलेले कामच खरी मानवता आहे. यामुळे आत्मिक आनंद तर मिळतोच, पान समाजाचे कल्याणही होते.
अद्रोहः सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा।
अनुग्रहश्च दानं च शीलमेतत्प्रशस्यते॥”
निस्वार्थ भाव से किया गया कर्म ही सच्ची मानवता है। इससे आत्मिक खुशी तो मिलती ही है, समाज का भी कल्याण होता है।
— Narendra Modi (@narendramodi) May 6, 2026
अद्रोहः सर्वभूतेषु कर्मणा मनसा गिरा।
अनुग्रहश्च दानं च शीलमेतत्प्रशस्यते॥ pic.twitter.com/5C9w0KNQwH


