पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, आपले विद्यार्थी असामान्य प्रतिभेने संपन्न आहेत आणि त्यांच्यामध्ये आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याची पूर्ण क्षमता आहे. त्यांनी नमूद केले की, परीक्षा पे चर्चाचा उद्देश विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांचा वैयक्तिक वाढ आणि यशासाठी अर्थपूर्ण वापर कसा करावा, यावर मार्गदर्शन करणे हा आहे.

या निमित्ताने पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. -

“विद्या वितर्को विज्ञानं स्मृतिस्तत्परता क्रिया। यस्यैते षड्गुणास्तस्य नासाध्यमतिवर्तते॥”
 

या सुभाषितामधून हा संदेश देण्यात आला आहे की, ज्या व्यक्तीकडे ज्ञान, तर्क, विज्ञान, स्मृती, तत्परता आणि कृतीशीलता आहे, ती व्यक्ती कोणत्याही आव्हानावर मात करू शकते आणि अशा व्यक्तीसाठी काहीही अशक्य नसते.


पंतप्रधानांनी एक्सवर लिहिलेः

“अद्भुत प्रतिभेने संपन्न असलेल्या आपल्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांची स्वप्ने साकार करण्याची पूर्ण क्षमता आहे. 'परीक्षा पे चर्चा'चा उद्देश देखील हाच आहे की, ते त्यांच्या प्रतिभा आणि कौशल्याचा सार्थक वापर कसा करू शकतात.

विद्या वितर्को विज्ञानं स्मृतिस्तत्परता क्रिया।

यस्यैते षड्गुणास्तस्य नासाध्यमतिवर्तते॥”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
One App For 2,400-Plus Government Services: How UMANG Is Changing Access In India

Media Coverage

One App For 2,400-Plus Government Services: How UMANG Is Changing Access In India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 27 मार्च 2026
March 27, 2026

Relief, Revival & Rise: How PM Modi is Building a Modern, Rooted & Self-Reliant India