ज्ञान, शहाणपण आणि दूरदृष्टी हे गुण जीवनातील यशाची पायाभरणी करतात, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. हे गुण अंगी बाणविलेला मनुष्य हा अत्यंत कठीण आव्हानांना यशस्वीरित्या सामोरे जाऊ शकतो, असे ते म्हणाले.
पंतप्रधानांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटले आहे,
“शास्त्रे प्रतिष्ठा सहजश्च बोधः प्रागल्भ्यमभ्यस्तगुणा च वाणी ।
कालानुरोधः प्रतिभानवत्त्वमेते गुणाः कामदुघाः क्रियासु ॥”
विषयाचे खरेखुरे ज्ञान, विवेक, निडर आत्मविश्वास, सक्षम वाणी ही सराव, काळाची मागणी ओळखणारे दूरदर्शित्व आणि सातत्याच्या शहाणपण हे सहा गुण प्रत्येक माणसासाठी ‘कामधेनू’ सारखे आहेत, ते प्रत्येक ध्येय गाठण्यासाठी मदत करतात, असा या संस्कृत सुभाषिताचा अर्थ आहे.
पंतप्रधानांनी समाज माध्यम X वरील आपल्या संदेशात लिहिले आहे,
“ज्ञान, विवेक आणि दूरदर्शित्वासारखे सद्गुण जीवनातील यशाचा मुख्य आधार आहेत. हे गुण असलेली व्यक्ती अत्यंत कठीण प्रसंगांमध्येही विजयी होते.
शास्त्रे प्रतिष्ठा सहजश्च बोधः प्रागल्भ्यमभ्यस्तगुणा च वाणी ।
कालानुरोधः प्रतिभानवत्त्वमेते गुणाः कामदुघाः क्रियासु ॥”
ज्ञान, विवेक और दूरदर्शिता जैसे सद्गुण जीवन में सफलता का प्रमुख आधार हैं। इनसे समृद्ध व्यक्ति कठिन से कठिन चुनौतियों में भी विजयी होता है।
— Narendra Modi (@narendramodi) June 19, 2026
शास्त्रे प्रतिष्ठा सहजश्च बोधः प्रागल्भ्यमभ्यस्तगुणा च वाणी ।
कालानुरोधः प्रतिभानवत्त्वमेते गुणाः कामदुघाः क्रियासु ॥ pic.twitter.com/CEbEwoc7wl


