उत्तम आरोग्य हीच जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे आणि त्याची जपणूक करण्यात व्यायामाची अत्यंत महत्त्वाची भूमिका असते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी देशातील सर्व नागरिकांना निरामय आणि आनंदी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
यासंदर्भात पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे-
“व्यायामाल्लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखम्। आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥”
व्यायामामुळे उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सामर्थ्य आणि सुख प्राप्त होते,असा संदेश हे सुभाषित देते. उत्तम आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे. आरोग्य हे सर्वकाही साध्य करण्याचे साधन आहे.
आपल्या एक्स पोस्टमध्ये पंतप्रधानांनी म्हटले आहे;
“उत्तम आरोग्य हीच सर्वात मोठी संपत्ती आहे, यात व्यायामाची भूमिका महत्वपूर्ण असते. मी सर्व देशवासीयांना उत्तम आरोग्य आणि आनंदी जीवन लाभावे, अशी प्रार्थना करतो.
व्यायामाल्लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखम्।
आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥”
अच्छा स्वास्थ्य ही जीवन की सबसे बड़ी संपत्ति है, जिसमें व्यायाम की भूमिका बहुत महत्वपूर्ण है। मैं सभी देशवासियों के स्वस्थ और सुखी जीवन की कामना करता हूं।
— Narendra Modi (@narendramodi) March 16, 2026
व्यायामाल्लभते स्वास्थ्यं दीर्घायुष्यं बलं सुखम्।
आरोग्यं परमं भाग्यं स्वास्थ्यं सर्वार्थसाधनम्॥ pic.twitter.com/JoDbsmETm7


