पवित्र श्री अमरनाथ यात्रेला आजपासून प्रारंभ होत आहे. या यात्रेनिमित्त शिवभक्तांना शुभेच्छा देताना पंतप्रधानांनी एक संस्कृत सुभाषित सामायिक केले:
“वाग्बुद्धिचित्तकरणैश्च तपोभिरुग्रैः
शक्यं समाकलयितुं न यदीयरूपम्।
तं भक्तिभावसुलभं शरणं नतानां
नित्यं भजाम्यऽमरनाथमहं दयालुम्॥"
या सुभाषिताचा अर्थ असा आहे : " शब्द, बुद्धी, मन, इंद्रिये किंवा अगदी कठोर तपश्चर्येद्वारेही ज्याच्या मूळ स्वरूपाला समजून घेणे अशक्य आहे, जो भक्तीभावाने सहज प्राप्त होतो आणि जो शरण आलेल्या भक्तांचा आश्रयदाता आहे, अशा त्या दयाळू भगवान अमरनाथांची मी नित्य पूजा करतो.”
X (एक्स) या समाजमाध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणतात :
समस्त शिवभक्तांना पवित्र आणि पावन श्री अमरनाथ यात्रेच्या शुभारंभानिमित्त अनेक शुभेच्छा! बाबा बर्फानी यांच्या दिव्य दर्शनासाठीची ही यात्रा आपल्या सगळ्यांच्या जीवनात सुख-समृद्धी, सौभाग्य आणि उत्तम आरोग्य घेवून येवो !
जय बाबा बर्फांनी !
वाग्बुद्धिचित्तकरणैश्च तपोभिरुग्रैः
शक्यं समाकलयितुं न यदीयरूपम्।
तं भक्तिभावसुलभं शरणं नतानां
नित्यं भजाम्यऽमरनाथमहं दयालुम्॥
समस्त शिवभक्तों को पावन-पुनीत श्री अमरनाथ यात्रा के शुभारंभ की अनंत शुभकामनाएं! बाबा बर्फानी के दिव्य दर्शन की यह यात्रा आप सभी के जीवन में सुख-समृद्धि, सौभाग्य और उत्तम स्वास्थ्य लेकर आए।
— Narendra Modi (@narendramodi) July 3, 2026
जय बाबा बर्फानी!
वाग्बुद्धिचित्तकरणैश्च तपोभिरुग्रैः
शक्यं समाकलयितुं न यदीयरूपम्।
तं… pic.twitter.com/l3WcdLkq9z


