पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम एस एम ई कॉम्पिटीटीव्ह (LEAN) योजनेच्या वेबसाईटची लिंक सामायिक केली आहे. भारताच्या आर्थिक प्रगतीचे आधारस्तंभ असणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना बळकट करण्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा हा एक भाग म्हणजे ही योजना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एम एस एम ई चॅम्पियन योजनेच्या अंतर्गत ही एम एस एम ई कॉम्पिटीटीव्ह (LEAN) योजना सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या एका ट्विट ला उत्तर देताना पंतप्रधानांनी हे ट्विट केले ,
भारताच्या आर्थिक प्रगतीचे प्रमुख आधारस्तंभ असलेल्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला बळकट करण्याच्या प्रयत्नाचा lean.msme.gov.in" ही योजना एक भाग आहे .
A part of our efforts to strengthen the MSME sector, which is a key pillar of India’s economic growth. https://t.co/ZBm5rF4kRa https://t.co/i6OHYJeXmj
— Narendra Modi (@narendramodi) March 13, 2023


