पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सामाजिक माध्यमावर एक संस्कृत सुभाषित सामायिक केले. कष्ट, संयम, कौशल्य, दक्षता, जिद्द, स्मरणशक्ती आणि विचारपूर्वक केलेली कृती, या गोष्टींमुळेच माणसाची प्रगती होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान म्हणाले की, जर आपण संयम आणि निष्ठेने कष्ट केले, तर आपल्याला नक्कीच यश मिळते. यामुळे देशाची प्रगती होते आणि राष्ट्राला नवे सामर्थ्य मिळते.
एक्स वर केलेल्या एका संदेशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिले की,:
संयम आणि निष्ठेने केलेले कष्ट मोठे यश मिळवून देऊ शकतात. यामुळे देशाच्या समृद्धीला आणि सामर्थ्याला नवी ऊर्जा मिळते.
उत्थानं संयमो दाक्ष्यमप्रमादो धृतिः स्मृतिः।
समीक्ष्य च समारम्भो विद्धिमूलं भवस्य तु॥
कष्ट, संयम, कौशल्य, दक्षता, जिद्द, स्मरणशक्ती आणि विचारपूर्वक केलेली कृती - हीच प्रगतीची खरी सूत्रे आहेत.
संयम और समर्पण के साथ किया गया परिश्रम अद्भुत सफलता दे सकता है। इससे राष्ट्र की समृद्धि और सामर्थ्य को भी एक नई ऊर्जा मिलती है।
— Narendra Modi (@narendramodi) April 28, 2026
उत्थानं संयमो दाक्ष्यमप्रमादो धृतिः स्मृतिः।
समीक्ष्य च समारम्भो विद्धिमूलं भवस्य तु॥ pic.twitter.com/WSPXyBzWEm


