पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योग्य आचरणाचे महत्त्व विशद करणारे एक संस्कृत सुभाषित सामायिक केले असून योग्य आचरण हे एखाद्या दीपस्तंभाप्रमाणे आहे जे केवळ एका व्यक्तीचेच आयुष्य नव्हे तर संपूर्ण समाज उजळवून टाकते, असे म्हटले आहे. याच आदर्शांना अंगीकारून आपल्या देशातील लोक संपूर्ण संयम, सामर्थ्य आणि कर्तव्यनिष्ठेने राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभागी झाले आहेत, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले आहे.
पंतप्रधानांनी ‘एक्स’ वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे:
सदाचार हा एक दीप आहे जो केवळ व्यक्तीलाच नव्हे तर समाजालाही प्रकाशित करतो. हा आदर्श स्वीकारून, आपले देशवासी आज पूर्ण संयम, सामर्थ्य आणि समर्पणाने राष्ट्रउभारणीच्या कार्यात गुंतले आहेत.
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि।।"
काय करावे आणि काय करु नये याबद्दलचा निर्णय हा व्यक्तिनिष्ठ मतांवर किंवा क्षणिक मोहावर अवलंबून असता कामा नये तर तो शास्त्रांमध्ये दिलेल्या सुव्यवस्थित मानदंडानुसार असावा ज्यामुळे आचरणाला दिशा आणि शिस्त लागते. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने स्थापित मूल्यव्यवस्थेनुसार आचरण केले पाहिजे ज्यामुळे त्याचे आचरण संतुलित, प्रमाणित आणि अर्थपूर्ण असेल.
श्रेष्ठ आचरण वह दीपक है, जिससे व्यक्ति के साथ-साथ समाज भी आलोकित होता है। इसी आदर्श को अपनाते हुए हमारे देशवासी आज पूरे संयम, सामर्थ्य और कर्तव्यनिष्ठा से राष्ट्र निर्माण में जुटे हुए हैं।
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2026
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म… pic.twitter.com/G3sXoqXB4Q


