पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 मे 2023 रोजी पोर्ट मोरेस्बी येथे फिजी प्रजासत्ताकचे पंतप्रधान सीतवेनी  लिगामामादा राबुका यांची हिंद-प्रशांत द्वीपसमूह सहकार्य मंचाच्या  (FIPIC) तिसर्‍या शिखर परिषदेच्या निमित्ताने भेट घेतली. .दोन्ही नेत्यांची ही पहिलीच भेट होती. नोव्हेंबर 2014 मध्ये  फिजी भेटीदरम्यान FIPIC चा प्रारंभ  करण्यात आल्याची आठवण पंतप्रधानांनी सांगितली आणि तेव्हापासून प्रशांत द्वीपसमूह देशांसोबत  भारताचे सहकार्य अधिक दृढ झाल्याचे नमूद केले.

उभय नेत्यांनी दोन्ही देशांमधील घनिष्ठ आणि बहुआयामी विकास भागीदारीचा आढावा घेतला आणि क्षमता निर्मिती , आरोग्य सेवा, हवामान कृती, नवीकरणीय ऊर्जा, कृषी, शिक्षण आणि माहिती तंत्रज्ञान यासह प्रमुख क्षेत्रातील प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक घडामोडींवरही विचारांची देवाणघेवाण केली आणि बहुपक्षीय व्यासपीठांवर सहकार्य अधिक दृढ करण्याबाबत सहमती दर्शवली.. फिजीचे राष्ट्रपती  रतु विलियम मायवाली काटोनिवेरे यांच्या वतीने  पंतप्रधान राबुका यांनी पंतप्रधान मोदी यांना फिजीचा कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी (CF) हा सर्वोच्च सन्मान प्रदान केला. पंतप्रधान मोदी यांनी या सन्मानाबद्दल फिजी सरकार आणि तेथील जनतेचे आभार मानले आणि हा सन्मान भारताच्या जनतेला  आणि फिजी-भारतीय समुदायाच्या पिढ्यांना समर्पित केला, ज्यांनी दोन्ही देशांमधील विशेष आणि चिरकाल  संबंधात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Somnath Swabhiman Parv: “Feeling blessed to be in Somnath, a proud symbol of our civilisational courage,” says PM Modi

Media Coverage

Somnath Swabhiman Parv: “Feeling blessed to be in Somnath, a proud symbol of our civilisational courage,” says PM Modi
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 11 जानेवारी 2026
January 11, 2026

Dharma-Driven Development: Celebrating PM Modi's Legacy in Tradition and Transformation