पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, ओस्लो येथे आइसलँडच्या पंतप्रधान क्रिस्टर्न फ्रॉस्टडॉटिर यांच्याबरोबर द्विपक्षीय बैठक घेतली.

पंतप्रधान फ्रॉस्टडॉटिर यांनी पदभार स्वीकारल्यापासून या दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट होती. आइसलँडच्या इतिहासातील सर्वात युवा पंतप्रधान ठरल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान फ्रॉस्टडॉटिर यांचे अभिनंदन केले.

या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासंदर्भात आणि  विशेषतः लवकरच अंमलात येणाऱ्या भारत-युरोपियन मुक्त व्यापार संघटना, व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारासंबंधी चर्चा केली.दोन्ही देशांमधील व्यापार, गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्रातील सहकार्य क्षमता पूर्णपणे उपयोगात येण्यासाठी टीईपीए करार ही एक उत्कृष्ट संधी असल्यावर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

 

यावेळी दोन्ही नेत्यांनी भूऔष्णिक ऊर्जा, मत्स्यव्यवसाय, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, सर्जनशील अर्थव्यवस्था, संस्कृती, पर्यटन, गतिशीलता  आणि दोन्ही देशांमधील नागरिकांचा परस्पर संपर्क, यासारख्या क्षेत्रांमधील द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला आणि आर्क्टिक क्षेत्रातील संशोधनामध्ये सहकार्य वाढवण्यासंदर्भात चर्चाही केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आइसलँडच्या पंतप्रधानांना, दोन्ही देशांना सोयीस्कर होईल अशा वेळी भारताच्या भेटीवर येण्याचे निमंत्रण दिले.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Trade policy review at WTO: World takes note of India's progress

Media Coverage

Trade policy review at WTO: World takes note of India's progress
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister pays homage to former Prime Minister Shri Rajiv Gandhi
August 20, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi has paid homage to former Prime Minister, Shri Rajiv Gandhi, on the occasion of his birth anniversary.

In a post on X, Shri Modi said;

“On the occasion of his birth anniversary, paying homage to former Prime Minister of India, Shri Rajiv Gandhi.”