फ्रान्समध्ये एव्हीयन येथे सुरु असलेल्या जी7 शिखर परिषदेच्या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्झ यांची भेट घेतली. या दोन नेत्यांची या वर्षभरात झालेली ही दुसरी भेट आहे.
यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय सहभागातील प्रगतीचा आढावा घेतला आणि यावर्षीच्या सुरुवातीला झालेली चॅन्सेलर यांची यशस्वी भारतभेट तसेच भारत-युरोपीय महासंघ यांच्यातील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची सांगता यामुळे भारत-जर्मनी धोरणात्मक भागीदारीला मिळालेल्या गतीबद्दल समाधान व्यक्त केले. भारत आणि जर्मनी यांच्यातील राजकीय संबंधांना 2026 मध्ये 75 वर्षे पूर्ण होत आहेत, या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांनी व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षितता, हरित आणि शाश्वत विकास, तंत्रज्ञान, नवोन्मेष, शिक्षण आणि गतिशीलता यांसह विविध क्षेत्रांमधील सहकार्य आणखी मजबूत करण्याप्रती बांधिलकीची ग्वाही दिली. संरक्षण उद्योग सहकार्य आराखड्यावर झालेल्या स्वाक्षऱ्या तसेच जर्मनीतून प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी ट्रान्झिट व्हिसावर सवलत देण्याची अंमलबजावणी या घडामोडींचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले.

पश्चिम आशियातील परिस्थिती तसेच रशिया-युक्रेन संघर्ष यांच्यासह परस्पर स्वारस्याच्या क्षेत्रीय आणि जागतिक घडामोडींबाबत दोन्ही नेत्यांनी आपापले विचार व्यक्त केले. पश्चिम आशियातील संघर्ष संपवण्यासाठी झालेल्या समझोत्याचे देखील त्यांनी स्वागत केले.
जर्मनीमध्ये यावर्षीच्या उत्तरार्धात आयोजित करण्यात आलेल्या 8व्या भारत-जर्मनी आंतर-सरकारी सल्लामसलत (आयजीसी) परिषदेत सहभागी होण्याचे आमंत्रण चॅन्सेलर मर्झ यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले.
The talks with Chancellor Merz were very fruitful. We discussed ways to further cement bilateral cooperation by working together in trade, investments, circular economy, defence, IT and more. We also talked about boosting cultural linkages between our nations.@bundeskanzler… pic.twitter.com/05wKDJvdzp
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2026
Die Gespräche mit Bundeskanzler Merz waren sehr fruchtbar. Wir haben Möglichkeiten erörtert, wie wir die bilaterale Zusammenarbeit durch gemeinsame Anstrengungen in den Bereichen Handel, Investitionen, Kreislaufwirtschaft, Verteidigung, IT und weiteren Bereichen weiter festigen… pic.twitter.com/J97rAHHSTc
— Narendra Modi (@narendramodi) June 17, 2026


