ओदिशाचे माजी मुख्यमंत्री बिजू पटनायक यांच्या जयंतीनिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे स्मरण केले आहे.ओदिशाच्या विकासासाठी आणि लोकांना सक्षम करण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे यावेळी त्यांनी स्मरण केले.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“बिजू बाबू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन.ओदिशाच्या विकासासाठी आणि लोकांना सशक्त बनवण्यासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचे आम्ही स्मरण करतो.त्यांनी आणीबाणीला कडाडून विरोध केला होता कारण लोकशाही आदर्शांसाठीही ते कटिबद्ध होते.”
Remembering Biju Babu on his birth anniversary. We fondly recall his contribution towards Odisha’s development and empowering people. He was also staunchly committed to democratic ideals, strongly opposing the Emergency.
— Narendra Modi (@narendramodi) March 5, 2025


