ज्ञान अमर्याद असून ते सामायिक केले किंवा त्याचा विस्तार केला तरीही ते कमी होत नाही, परंतु त्याची परिपूर्णता अक्षय रहाते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे ,
विद्यमान ज्ञानापासून शिकणे आणि त्यातून नवीन निष्कर्ष काढणे यामुळे अनंत नव्या शक्यता आणि नवोन्मेष निर्माण होतात, तरीही मूळ बुद्धिमत्ता ही अक्षय रहाते, असे त्यांनी पुढे अधोरेखित केले.
ईश उपनिषदातील ज्ञानाच्या चिरंतनतेला आवाहन करणारा एक पवित्र संस्कृत श्लोक पंतप्रधानांनी उद्धृत केला आहे:
“पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥”
पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते।
— Narendra Modi (@narendramodi) February 20, 2026
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते॥ pic.twitter.com/JqueNbycVb


