पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी आज उझबेकिस्तान प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झीयोयेव यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधला.
अध्यक्ष मिर्झीयोयेव यांनी भारताच्या येत्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान आणि भारतीय जनतेला हार्दिक शुभेच्छा दिल्या.
उभय नेत्यांनी व्यापार, संपर्क, आरोग्य, तंत्रज्ञान आणि लोकांमधील संबंध यासह द्विपक्षीय सहकार्याच्या अनेक प्रमुख क्षेत्रांमधील प्रगतीचा आढावा घेतला.
त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर विचारांचे आदानप्रदान केले आणि भारत आणि मध्य आशियामधील प्राचीन काळापासूनचे संबंध आणखी मजबूत करण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
दोन्ही नेत्यांनी परस्परांच्या संपर्कात राहण्यावर सहमती व्यक्त केली.
Had a fruitful conversation with President of Uzbekistan, Mr. Shavkat Mirziyoyev. We reviewed the progress achieved in key areas of our bilateral cooperation and reaffirmed our shared resolve to further advance the India–Uzbekistan Strategic Partnership.@president_uz
— Narendra Modi (@narendramodi) August 12, 2025


