भारतीयांच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी सुलतान तारीक यांनी दिल्या शुभेच्छा
शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांकडून आभार, डिसेंबर 2023 मध्ये सुलतान तारीक यांच्या ऐतिहासिक भारत भेटीचा दिला संदर्भ
भारत-ओमान संबंध अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेची दोन्ही नेत्यांनी केली पुष्टी
सुलतान तारीक आणि ओमानवासीयांना पंतप्रधानांनी दिल्या ईदच्या शुभेच्छा

ओमानचे राजे सुलतान हैथाम बिन तारीक यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधला.

नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल सुलतान तारीक यांनी त्यांचं अभिनंदन केलं.

ओमान आणि भारतात अनेक शतकं जुनी मैत्री असल्याचं सुलतान तारीक यांनी सांगितलं. भारताच्या जनतेला त्यांनी प्रगती आणि भरभराटीसाठी शुभेच्छा दिल्या.

सुलतान तारीक यांनी दिलेल्या शुभेच्छांबद्दल मोदी यांनी त्यांचे आभार मानले. डिसेंबर 2023 मधे सुलतान तारीक यांनी केलेल्या भारत दौऱ्यामुळे सर्व क्षेत्रातले द्विपक्षीय संबंध अधिक दृढ झाल्याचं मोदी यांनी सांगितलं.

दोन देशांच्या परस्पर हितासाठी भारत आणि ओमान यांच्यातील भागीदारी अधिक मजबूत करण्याचा निर्धार दोनही नेत्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांनी सुल्तान तारीक आणि ओमानच्या जनता यांना ईद अल अधा सणासाठी शुभेच्छा दिल्या.  

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India remains fastest-growing major economy, domestic investors power market resilience

Media Coverage

India remains fastest-growing major economy, domestic investors power market resilience
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 15 मार्च 2026
March 15, 2026

Empowering Bharat: From Loans to Global Leadership Under PM Modi