राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आपण संशोधन, नवोन्मेष आणि वैज्ञानिक कुतूहलाचा उत्सव साजरा करतो, जो आपल्या देशाला पुढे नेत राहतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.

पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले की, "हा दिवस सर सी.व्ही. रमण यांनी लावलेल्या 'रमण इफेक्ट' या क्रांतिकारी शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो." या शोधामुळे भारतीय संशोधनाला जागतिक नकाशावर भक्कम स्थान मिळाले, असेही पंतप्रधान म्हणाले.

आपल्या तरुणांना सक्षम बनवण्याचा, संशोधन परिसंस्था अधिक बळकट करण्याचा आणि राष्ट्र विकास तसेच जागतिक कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा आपल्या निर्धाराचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले;

आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त, आपण संशोधन, नवोन्मेष आणि वैज्ञानिक कुतूहलाचा गौरव करतो, जो आपल्या देशाला पुढे नेतो.

हा दिवस सर सी.व्ही. रमण यांच्या 'रमण इफेक्ट' या क्रांतिकारी शोधाच्या स्मृती जपण्यासाठी साजरा केला जातो. या शोधामुळे भारतीय संशोधनाला जागतिक स्तरावर भक्कम स्थान मिळाले आहे.

आपल्या तरुणांना सक्षम बनवण्यासाठी, संशोधन परिसंस्था अधिक बळकट करण्यासाठी आणि राष्ट्रीय विकास आणि जागतिक कल्याणासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यासाठी आम्ही आमच्या संकल्पाचा पुनरुच्चार करतो.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Teachers: The artists of education

Media Coverage

Teachers: The artists of education
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 7 सप्टेंबर 2026
September 07, 2026

Vasudhaiva Kutumbakam in Action: Tech Hub, Border Villages, Global Leadership by PM Modi