पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक जल दिनाच्या निमित्ताने प्रत्येक थेंब पाण्याचे संवर्धन करण्याची आणि या मौल्यवान संसाधनाचा जबाबदारीने वापर करण्याची आपली बांधिलकी पुन्हा दृढ करण्याचे आवाहन सर्वांना केले आहे.
जीवन टिकवण्यासाठी आणि पृथ्वीच्या भविष्यास आकार देण्यासाठी पाण्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका अधोरेखित करताना, मोदी यांनी शाश्वत पद्धती अवलंबणाऱ्या, जनजागृती करणाऱ्या आणि संवर्धनाची संस्कृती जोपासणाऱ्या व्यक्तींचे कौतुकही केले.
पंतप्रधानांनी 'एक्स'वर लिहिले:
"पाणी आपल्याला जीवन देते आणि आपल्या पृथ्वीच्या भविष्यास आकार देते. जागतिक जल दिनानिमित्त, प्रत्येक थेंब पाण्याचे संवर्धन करण्याची आणि त्याचा जबाबदारीने वापर करण्याची आपली बांधिलकी पुन्हा दृढ करूया. आजचा दिवस शाश्वत पद्धती अवलंबणाऱ्या, जनजागृती करणाऱ्या आणि संवर्धनाची संस्कृती जोपासणाऱ्या लोकांचे कौतुक करण्याचाही आहे."
Water sustains us and shapes our planet’s future.
— Narendra Modi (@narendramodi) March 22, 2026
On World Water Day, let us reaffirm our commitment to conserve every drop of water and use it responsibly. Today is also a day to appreciate those who engage in sustainable practices, promote awareness and nurture a culture of… pic.twitter.com/lG2WlOmYGD


