मॉरिशसमध्ये रुपे कार्ड ही सुरू होणार
यामुळे लोकांमधले परस्पर संबंध अधिक दृढ होऊन पर्यटनाला चालना मिळणार

श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये युनीफाईड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) या आर्थिक व्यवहारांच्या डिजिटल  सेवांच्या, तसेच मॉरिशसमध्ये रुपे कार्डच्या उद्घाटन समारंभाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी, श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ, दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम उद्या 12 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी एक वाजता होणार आहे.

अर्थतंत्रज्ञानातील नवकल्पना (फिनटेक इनोव्हेशन) आणि डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये (डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर) भारत आघाडीवर आहे.  भागीदार देशांना भारताचे विकासाबाबतचे अनुभव आणि नवकल्पना माहीत करुन द्याव्यात, यावर पंतप्रधानांनी जोरदार भर दिला आहे.  श्रीलंका आणि मॉरिशस यांच्याशी भारताचे असलेले दृढ सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संबंध लक्षात घेता, या उपक्रमाद्वारे  वेगवान आणि सातत्यपूर्ण डिजिटल व्यवहारांच्या  माध्यमातून, तसेच देशांमधील परस्पर डिजिटल संपर्कव्यवस्था वाढवल्यामुळे, सर्व स्तरातील लोकांना मोठा फायदा होणार आहे.

या उपक्रमामुळे श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांसाठी तसेच भारतात प्रवास करणाऱ्या मॉरिशसच्या नागरिकांसाठी यूपीआयच्या माध्यमातून विक्रेता-ग्राहक आर्थिक व्यवहार (सेटलमेंट) सेवा उपलब्ध होणार आहे.  मॉरिशसमध्ये होत असलेल्या रुपे कार्ड सेवांच्या विस्तारामुळे,  मॉरिशसमध्ये रुपे यंत्रणेवर आधारीत कार्ड जारी करणे मॉरिशसच्या बँकांना शक्य होईल आणि भारत तसेच मॉरिशस या दोन्ही देशांमध्ये सेटलमेंटसाठी,  रुपे कार्ड सहजपणे वापरता येईल.

 

Explore More
78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

78 व्या स्वातंत्र्य दिनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्याच्या तटावरून केलेले संबोधन
Semicon India 2024: Top semiconductor CEOs laud India and PM Modi's leadership

Media Coverage

Semicon India 2024: Top semiconductor CEOs laud India and PM Modi's leadership
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 सप्टेंबर 2024
September 12, 2024

Appreciation for the Modi Government’s Multi-Sectoral Reforms