नमस्कार,
आमचे स्नेहपूर्ण स्वागत आणि आद रातिथ्यासाठी मी राष्ट्रपती एर्मिनी यांचे हार्दिक आभार मानतो .
त्यांच्याकडून गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन या पुरस्काराने सन्मानित होणे हा माझ्यासाठी आणि 140 कोटी भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या सन्मानाचा मी विनम्रतेने स्विकार करत असताना तो त्या सर्व देशांना समर्पित करत आहे जे हवामान  बदलाच्या आव्हानाशी लढत आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणाला भावी  पिढ्यांप्रति  आपली जबाबदारी मानत आहेत.

मित्रांनो,
माझा हा दौरा अशा ऐतिहासिक वेळेस होत आहे, जेव्हा सेशेल्स आपल्या स्वातंत्र्याची पन्नास वर्षे पूर्ण करत आहे आणि भारत व सेशेल्स यांच्या राजनैतिक संबंधांना  देखील पन्नास वर्ष होत आहेत.  
या पन्नास वर्षाच्या प्रवासात आम्ही मैत्रीला विश्वासात, विश्वासाला सहकार्यात आणि सहकार्याला जन कल्याणामध्ये बदलले आहे.

मित्रांनो,
हिंदी महासागराने शतकानुशतके भारत आणि सेशेल्स यांच्यातील  संबंध जोपासले  आहेत . त्याच्या लाटांनी आमच्यामधील व्यापार, संस्कृती आणि मानवी संबंधांना सातत्याने पोसले आहे. आमच्या यावर विश्वास आहे की, हिंदी महासागर हे आमचे एकत्रित घर आहे. त्याची सुरक्षा, टिकाऊपणा आणि समृद्धता ही आमची सामायिक जबाबदारी आहे. हीच भावना आमच्या महासागर या दृष्टीकोनाचाही आधार आहे.

मित्रांनो,
या वर्षी फेब्रुवारी मध्ये अध्यक्षांनी  आपल्या भारत दौऱ्यामध्ये जारी केलेल्या एका संयुक्त व्हिजनमधून आमच्या भविष्यातील भागीदारीचा आराखडा तयार करण्यात आला होता. यावर पुढे वाटचाल करताना आमचे परस्पर सहकार्य अधिक मजबूत होणार आहे.
 

आज आम्ही आमच्या आर्थिक सहकार्याला अधिक मजबूत आणि भविष्यवेधी करण्यावर चर्चा केली आहे. आम्ही दोन्ही देशांसाठी उद्योगांच्या नव्या संधींचा शोध सुरुच ठेवणार आहोत.   

भारत आणि सेशेल्स यांच्यातील संपर्क सुविधा सुधारण्यासाठी देखील काम केले जाईल. यामुळे दोन्ही देशांतील व्यापाराला चालना मिळेलच, शिवाय पूर्व आफ्रिका आणि हिंदी महासागर क्षेत्राशी असलेले संबंधही अधिक दृढ होतील.
डिजिटल तंत्रज्ञान हे दोन्ही देशांतील भौगोलिक अंतर कमी करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असा आमचा विश्वास आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील भारताचा यशस्वी अनुभव आम्ही सेशेल्ससोबत सामायिक करू. तसेच, सेशेलमध्ये यूपीआय  सुरू करण्यासाठी आज सामंजस्य करार  करण्यात येत असल्याचा मला आनंद आहे.

मित्रांनो,
विकास भागीदारी ही भारत-सेशेल्स संबंधांची एक महत्त्वाची ओळख आहे. भारताने नेहमीच सेशेल्सच्या प्राधान्यक्रमांना, गरजांना आणि आकांक्षांना केंद्रस्थानी ठेवून सहकार्य केले आहे.
राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान आम्ही 175 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. या अंतर्गत सामाजिक गृहनिर्माण, वाहतूक, कौशल्य विकास, अन्नसुरक्षा, शिक्षण आणि संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये काम सुरू आहे. सेशेल्समधील मानवी संसाधन विकासाला सहकार्य करणे ही भारताची विशेष प्राथमिकता राहिली आहे.

 

सेशेल्समधील नागरी सेवकांच्या प्रशिक्षणात भारत योगदान देत असल्याचा मला आनंद आहे. आज प्रोफेशनल अँड टेक्निकल सेंटरच्या आभासी भूमिपूजनाचाही कार्यक्रम होत आहे. हे केंद्र भविष्यात सेशेल्सच्या युवकांच्या कौशल्य, रोजगाराच्या संधी आणि आत्मविश्वासाला नवी उंची देईल, असा आमचा विश्वास आहे.

मित्रांनो,
आरोग्य क्षेत्रातील भारत-सेशेल्स भागीदारीने काळाच्या कसोटीवर आपली विश्वासार्हता सिद्ध केली आहे. कोविडसारख्या कठीण काळात लसींचा पुरवठा करून भारताने खऱ्या मित्राची भूमिका निभावली.

 

आज जनऔषधी संदर्भात झालेल्या सामंजस्य करारामुळे सेशेल्सच्या नागरिकांना उत्तम दर्जाची आणि परवडणारी औषधे उपलब्ध करून देण्याला सहकार्य मिळेल. क्षमता विकास आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून सेशेल्समधील आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी भविष्यातही भारत सातत्याने प्रयत्न करत राहील.

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways to roll out the first rake of 20 LHB coaches for Bangladesh Railway on August 12

Media Coverage

Indian Railways to roll out the first rake of 20 LHB coaches for Bangladesh Railway on August 12
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 12 ऑगस्ट 2026
August 12, 2026

India Rising on Every Front: Economic Strength, Global Recognition & Self-Reliance Under PM Modi’s Vision