सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रात तरुणाईची रुचि आणि समर्पणाची भावना अत्यंत आनंददायी: पंतप्रधान
तुझे विचारही तुझ्या पेंटिंगप्रमाणेच सुंदर आहेत- पंतप्रधान
लसीकरण मोहीम, शिस्त आणि 130 कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच कोविड विरुद्धच्या लढ्याला बळ मिळते आहे : पंतप्रधान
सकारात्मकतेचा प्रसार करण्याच्या स्टीव्हनच्या प्रयत्नांपासून लोक प्रेरणा घेतील अशी आशा : पंतप्रधान
स्टीव्हन हॅरिस ने पंतप्रधानांना पत्र आणि आपली दोन पेंटिंग्ज पाठवली होती

बंगळुरूचा विद्यार्थी असलेल्या स्टीव्हन हॅरिसच्या पत्राला उत्तर देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचे आणि त्याच्या पेंटिंगचे कौतूक केले आहे. या 20 वर्षांच्या युवकाने पंतप्रधान मोदी यांची स्वतः काढलेली दोन चित्रे आणि एक पत्र त्यांना पाठवले होते. त्यावर, मोदी यांनी त्याला प्रोत्साहन देणारे आणि कौतूक करणारे उत्तर दिले आहे.

स्टीव्हनसारख्या युवकांना सर्जनशील आणि कलात्मक क्षेत्रांमध्ये असलेली रुचि आणि समर्पण अत्यंत आनंददायी आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. “तुझ्या पेंटिंगमधून तुझे कलेतील नैपुण्य आणि गोष्टींचा सखोल अनुभव घेण्याचे कौशल्य दिसते. या पेंटिंग्जमधील बारकावे खरोखरच कौतुकास्पद आहेत.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 

या युवा कलाकाराने आपल्या पत्रात, सार्वजनिक आरोग्य आणि सध्याच्या कठीण काळात लोकांच्या कल्याणाबाबत व्यक्त केलेली भावना आणि मते यांचेही पंतप्रधानांनी कौतूक केले आहे. “लसीकरण मोहीम, शिस्त आणि 130 कोटी भारतीयांच्या एकत्रित प्रयत्नांमुळेच कोविड विरुद्धच्या लढ्याला बळ मिळते आहे” असे पंतप्रधानांनी आपल्या उत्तरात लिहिले आहे.

सकारात्मकतेचा प्रसार करण्याच्या स्टीव्हनच्या प्रयत्नांपासून लोक प्रेरणा घेतील अशी आशा पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली आहे.

स्टीवनने आपल्या पत्रात पंतप्रधानांना सांगितले की तो गेल्या 15 वर्षांपासून पेंटिंग करतो आहे आणि विविध स्तरावर त्याने, 100 पुरस्कार जिंकले आहेत. पंतप्रधान आपले प्रेरणास्थान असल्याचे नमूद करत स्टीव्हनने कोरोना विरुद्धच्या भारताच्या लसीकरण मोहिमेची प्रशंसा केली आहे.

स्टीव्हन हॅरिसने पाठवलेली पेंटिंग्ज खाली बघता येतील.

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Bank credit recorded robust growth during H2FY26

Media Coverage

Bank credit recorded robust growth during H2FY26
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
PM greets public representatives across the country on the occasion of Panchayati Raj Day
April 24, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam highlighting the the essence of people’s representative:

“प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम्।

नात्मप्रियं प्रियं राज्ञः प्रजानां तु प्रियं प्रियम्॥"

The Subhashitam conveys, "The happiness of the people’s representative lies in the happiness of the people; his welfare lies in the welfare of the people. People’s representative has no personal favourites. Whatever is dear to the people is what is dear to him."

Shri Modi also greeted public representatives across the country on the occasion of Panchayati Raj Day,today. "Your dedication to public service and service to the nation is truly inspiring for everyone" Shri Modi remarked.

The Prime Minister wrote on X;

“पंचायती राज दिवस के अवसर पर देशभर के जनप्रतिनिधियों का हार्दिक अभिनंदन! जनसेवा के साथ राष्ट्रसेवा के प्रति आप सभी का समर्पण हर किसी को प्रेरित करने वाला है।

प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां च हिते हितम्।

नात्मप्रियं प्रियं राज्ञः प्रजानां तु प्रियं प्रियम्॥"