हर घर तिरंगा चळवळीला पाठिंबा देण्याचे नागरिकांना कळकळीचे आवाहन

पिंगली वेंकय्या यांच्या जयंतीनिमित्त, देशाला तिरंगी ध्वज देण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचे स्मरण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पिंगली वेंकय्या यांना आदरांजली अर्पण केली. हर घर तिरंगा चळवळीला पाठिंबा दर्शवण्यासाठी  नागरिकांनी 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगी झेंडा फडकावून आपापले सेल्फी काढून ते harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करावेत, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी देशवासियांना केले आहे.

आपल्या X वरील संदेशात पंतप्रधान म्हणाले,

“पिंगली वेंकय्या यांच्या जयंतीदिनी त्यांचे स्मरण करतो. आपल्याला तिरंगा ध्वज देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अविस्मरणीय आहेत. हर घर तिरंगा चळवळीला पाठींबा द्या, 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत तिरंगा ध्वज फडकवा आणि त्यासोबत काढलेला सेल्फी harghartiranga.com मार्फत सगळ्यांना पाठवण्यास विसरू नका!”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
India's banking sector resilient; 11-13% credit growth for January-June likely: Survey

Media Coverage

India's banking sector resilient; 11-13% credit growth for January-June likely: Survey
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 20 एप्रिल 2026
April 20, 2026

Honouring Saints, Powering Futures: PM Modi’s Leadership That Blends Heritage, Highways and High Growth