पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाकवी सुब्रमण्यम भारती यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
महाकवी भारती यांच्या कवितांमुळे धैर्य निर्माण केले; त्यांच्या विचारांमध्ये असंख्य लोकांच्या मनावर कायमचा ठसा उमटवण्याची आणि भारताच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चेतनेला प्रकाश देण्याची शक्ती होती, असे मोदींनी म्हटले आहे. त्यांनी न्याय्य आणि समावेशक समाज निर्माण करण्यासाठी काम केले. तमिळ साहित्य समृद्ध करण्यातील त्यांचे योगदान देखील अतुलनीय आहे, असेही पुढे पंतप्रधानांनी म्हटले आहे
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“महाकवी सुब्रमण्यम भारती यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली. त्यांच्या कवितांनी धैर्य निर्माण केले; आणि त्यांच्या विचारांमध्ये असंख्य लोकांच्या मनावर अमीट ठसा उमटवण्याची शक्ती होती. त्यांनी भारताच्या सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जाणीवेला उजळवून टाकले. त्यांनी न्याय्य आणि समावेशक समाज निर्माण करण्यासाठी काम केले. तमिळ साहित्य समृद्ध करण्यातील त्यांचे योगदान देखील अतुलनीय आहे.”
Tributes to Mahakavi Subramania Bharati on his birth anniversary. His verses ignited courage and his thoughts had the power to leave a lasting impression on the minds of countless people. He illuminated India’s cultural and national consciousness. He worked towards creating a…
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2025
மகாகவி சுப்ரமணிய பாரதியின் பிறந்தநாளில் அவருக்கு மரியாதை செலுத்துகிறேன் . அவரது கவிதைகள் துணிவைத் தூண்டின, அவரது சிந்தனைகள் எண்ணற்ற மக்களின் மனதில் நீடித்த தாக்கத்தை ஏற்படுத்தும் ஆற்றலைக் கொண்டிருந்தன. இந்தியாவின் கலாச்சார, தேசிய உணர்வை அவர் ஒளிரச் செய்தார். நீதியான,…
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2025


