गेल्या वर्षी आजच्याच दिवशी पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप जीवांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज श्रद्धांजली अर्पण केली. बळी ठरलेल्या निष्पापांचे स्मरण करताना पंतप्रधान म्हणाले की, देश त्यांना कधीही विसरणार नाही. तसेच, दुःखाच्या या प्रसंगी पीडित कुटुंबांच्या पाठीशी उभे राहण्याच्या देशाच्या अढळ वचनबद्धतेचा त्यांनी पुनरुच्चार केला.

या दुःखात संपूर्ण भारत एकवटलेला असून दहशतवादाविरोधात आमचा संकल्प अधिक दृढ झाला असल्याचे त्यांनी अधोरेखोल केले. देश कोणत्याही प्रकारच्या दहशतीसमोर कधीही झुकणार नाही आणि दहशतवाद्यांचे कुटील मनसुबे कधीही यशस्वी होणार नाहीत, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

'एक्स' या समाज माध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान लिहितात:

"गेल्या वर्षी आजच्याच दिवशी पहलगाम येथे झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप जीवांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो. देश त्यांना कधीही विसरणार नाही. या मोठ्या आघातातून सावरणाऱ्या शोकाकुल कुटुंबांच्या प्रती मी संवेदना व्यक्त करतो.

एक राष्ट्र म्हणून आपण सर्वजण या दुःखात आणि संकल्पात एक आहोत. भारत कोणत्याही प्रकारच्या दहशतवादासमोर कधीही मान झुकवणार नाही. दहशतवाद्यांचे हीन कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
The entrepreneurs building a self-reliant India

Media Coverage

The entrepreneurs building a self-reliant India
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 21 जुलै 2026
July 21, 2026

Self-Reliance Is No Longer a Slogan — It’s Happening Across Engines, UPI, Vaccines & FDI Under the Leadership of PM Modi