पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महान क्रांतिकारक वीर सावरकरजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले.
या स्वातंत्र्यसैनिकाचा गौरव करताना पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी देशाला गुलामीच्या शृंखलांतून मुक्त करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी पुढे असेही नमूद केले की, वीर सावरकरजींचे व्यक्तिमत्व आणि कार्य राष्ट्रसेवेसाठी प्रत्येक पिढीला प्रेरणा देत राहील.
पंतप्रधानांनी एक्सवर लिहिलेः
"महान क्रांतिकारक वीर सावरकरजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त सादर नमन. देशाला गुलामगिरीच्या श्रृंखलांपासून मुक्त करण्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व प्रत्येक पिढीला राष्ट्रसेवेसाठी प्रेरित करत राहील."
महान क्रांतिकारी वीर सावरकर जी को उनकी पुण्यतिथि पर सादर नमन। देश को गुलामी की जंजीरों से मुक्त कराने के लिए उन्होंने अपना जीवन समर्पित कर दिया। उनका व्यक्तित्व और कृतित्व हर पीढ़ी को राष्ट्रसेवा के लिए प्रेरित करता रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) February 26, 2026


