भारताच्या संसदेवर 13 डिसेंबर 2001 रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी तिचे रक्षण करताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर सुरक्षा कर्मचाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भावपूर्ण आदरांजली वाहिली.

 

कर्तव्य बजावताना आपल्या प्राणांचा त्याग केलेल्या सैनिकांच्या स्मृतींना देश आदरपूर्वक अभिवादन करत आहे. गंभीर संकटाच्या वेळी त्यांनी दाखवलेले धैर्य, त्यांची सतर्कता आणि जबाबदारीची अढळ भावना प्रत्येक नागरिकासाठी कायमच प्रेरणादायी आहे, असे पंतप्रधानांनी त्यांना आदरांजली वाहताना, म्हटले आहे.

 

या संदर्भात एक्स वर लिहिलेल्या संदेशात मोदी म्हणतात:

"आज या दिवशी, आपला देश 2001 मध्ये आपल्या संसदेवर झालेल्या भीषण हल्ल्यात आपले प्राण अर्पण करणाऱ्यांचे स्मरण करत आहे. गंभीर संकटाच्याप्रसंगी, त्यांनी दाखवलेले धैर्य, सतर्कता आणि कर्तव्याची अढळ भावना वाखाणण्याजोगी आहे. त्यांनी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाबद्दल भारत सदैव कृतज्ञ राहील."

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
A big deal: The India-EU partnership will open up new opportunities

Media Coverage

A big deal: The India-EU partnership will open up new opportunities
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 जानेवारी 2026
January 28, 2026

India-EU 'Mother of All Deals' Ushers in a New Era of Prosperity and Global Influence Under PM Modi