पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या कोकिला म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायिका शारदा सिन्हा जी यांच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे."लोकगीतांच्या माध्यमातून त्यांनी बिहारच्या कला आणि संस्कृतीला एक नवीन ओळख दिली, ज्यासाठी त्यांचे नेहमीच स्मरण केले जाईल. छठ या महान सणाशी संबंधित त्यांची मधुर गाणी लोकांच्या हृदयात कायमची कोरली गेली आहेत ", असे मोदी यांनी म्हटले आहे.
आपल्या एक्स पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे:
“बिहारच्या कोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गायिका शारदा सिन्हा यांना भावपूर्ण श्रद्धांजली.त्यांनी बिहारच्या कला संस्कृतीला आपल्या लोकगीतांच्या माध्यमातून नवी ओळख दिली, ज्यासाठी त्यांचे सदैव स्मरण केले जाईल.छठ महापर्वाशी संबंधित त्यांची सुमधूर गीते जनमानसात कायम जपली जातील”
बिहार कोकिला शारदा सिन्हा जी की पहली पुण्यतिथि पर उन्हें भावभीनी श्रद्धांजलि। उन्होंने बिहार की कला-संस्कृति को लोकगीतों के माध्यम से एक नई पहचान दी, जिसके लिए उन्हें सदैव याद किया जाएगा। महापर्व छठ से जुड़े उनके सुमधुर गीत हमेशा जनमानस में रचे-बसे रहेंगे।
— Narendra Modi (@narendramodi) November 5, 2025


