भारतमातेचे धाडसी सुपुत्र श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांना श्रद्धांजली वाहिली. मोदी म्हणाले की त्यांच्या क्रांतिकारी संकल्पनांसह त्यांनी स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक नवी जागृती घडवून आणली. “त्यांचे जीवन आणि आदर्श देशातील प्रत्येक पिढीला देशसेवेसाठी प्रेरित करत राहतील,” मोदी पुढे म्हणाले
एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणतात:
“भारतमातेचे वीर सुपुत्र श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरपूर्वक नमस्कार. त्यांनी त्यांच्या क्रांतिकारक विचारांसह स्वातंत्र्य चळवळीमध्ये एक नवी जागृती घडवून आणली. त्यांचे जीवन आणि आदर्श देशातील प्रत्येक पिढीला देशसेवेसाठी प्रेरित करत राहतील.”
भारत माता के वीर सपूत श्यामजी कृष्ण वर्मा को उनकी पुण्यतिथि पर सादर नमन। उन्होंने अपने क्रांतिकारी विचारों से आजादी के आंदोलन में नई चेतना जगाई थी। उनका जीवन और आदर्श देश की हर पीढ़ी को राष्ट्रसेवा के लिए प्रेरित करता रहेगा।
— Narendra Modi (@narendramodi) March 30, 2026


