पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘पोचिशे बोईशाख’ च्या विशेष प्रसंगी गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांना आदरांजली अर्पण केली.

गुरुदेव टागोर अतिशय अद्भुत प्रतिभेचे कवी, लेखक व विचारवंत तर होतेच शिवाय विलक्षण तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ञ, कलाकार व जगभरात भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.

गुरुदेव टागोर यांनी मानवतेच्या गहन भावनेला व भारतीय संस्कृतीच्या उदात्त आदर्शांना आपल्या साहित्यातून उजागर केले होते असे पंतप्रधानांनी नमूद केले. गुरुदेवांनी समाजात नवीन विचार, प्रतिभेची ऊर्जा व सांस्कृतिक स्वाभिमान विकसित केल्याचे त्यांनी पुढे सांगितले.

आज देशभरात गुरुदेव टागोरांच्या प्रति अतीव आदर व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जात असल्याचे मोदी यांनी म्हटले. यापुढेही गुरुदेवांच्या विचारांमुळे जनतेला त्यांच्या सर्व कार्यांमध्ये प्रेरणा व मार्गदर्शन मिळत राहील अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

पंतप्रधानांनी एक्स वरील आपल्या संदेशात म्हटले आहे,

“आज पोचिशे बोइशाख च्या विशेष निमित्ताने आम्ही सर्वजण गुरुदेव टागोर यांना आदरपूर्वक हार्दिक अभिवादन करत आहोत.

गुरुदेव टागोर अतिशय अद्भुत प्रतिभेचे कवी, लेखक व विचारवंत तर होतेच शिवाय विलक्षण तत्त्वज्ञ, शिक्षणतज्ञ, कलाकार व जगभरात भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते. गुरुदेव टागोर यांनी मानवतेच्या गहन भावनेला व भारतीय संस्कृतीच्या उदात्त आदर्शांना आपल्या साहित्यातून उजागर केले होते. गुरुदेवांनी समाजात नवीन विचार, प्रतिभेची ऊर्जा व सांस्कृतिक स्वाभिमान विकसित केला होता.

आज देशभरात गुरुदेव टागोरांच्या प्रति अतीव आदर व कृतज्ञतेची भावना व्यक्त केली जात आहे. यापुढेही गुरुदेवांच्या विचारांमुळे जनतेला त्यांच्या सर्व कार्यांमध्ये प्रेरणा व मार्गदर्शन मिळत राहील याची मला खात्री आहे.”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Indian Railways takes up 764 km of new lines to boost connectivity in Bihar’s Seemanchal region

Media Coverage

Indian Railways takes up 764 km of new lines to boost connectivity in Bihar’s Seemanchal region
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
पंतप्रधानांनी निःस्वार्थ सेवेच्या भावनेवर भर देणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले
August 07, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नि:स्वार्थ सेवेचे गुण आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न करता इतरांच्या कल्याणासाठी काम करण्याचा उदात्त आदर्श अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे:

"किं चन्द्रमाः प्रत्युपकारलिप्सया करोति गोभिः कुमुदावबोधनम्।

स्वभाव एवोन्नतचेतसां सतां परोपकारव्यसनं हि जीवितम्॥"

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले आहे:

किं चन्द्रमाः प्रत्युपकारलिप्सया करोति गोभिः कुमुदावबोधनम्।

स्वभाव एवोन्नतचेतसां सतां परोपकारव्यसनं हि जीवितम्॥