मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी, दोन्ही नेत्यांमध्ये, मध्यप्रदेश सरकारने सुप्रशासनासाठी राबवलेल्या उपक्रमांविषयी चर्चा झाली. तसेच सरकारच्या परिवर्तनशील योजना, लोकांच्या आयुष्यात कसे परिवर्तन घडवत आहेत, याविषयी देखील चर्चा झाली.
या संदर्भातल्या ट्वीट मध्ये पंतप्रधान म्हणतात;
"आज मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री @ChouhanShivraj जी यांची भेट घेतली, आणि त्यांच्याशी मध्यप्रदेशात सुशासनासाठी जे उपक्रम राबवले जात आहेत त्यांची माहिती घेतली. तसेच, सरकारच्या योजनांमुळे जनतेच्या जीवनमानात कसे सकारात्मक बदल होत आहेत, हे ही त्यांनी सांगितले.”
Met MP CM Shri @ChouhanShivraj Ji, who discussed the good governance initiatives of the MP Government and how their transformative schemes are bringing a positive change in people’s lives. pic.twitter.com/o1q4WfRXTQ
— Narendra Modi (@narendramodi) April 23, 2022




