मिशन गगनयान टीव्ही डी1 चाचणी उड्डाणाच्या यशस्वी प्रक्षेपणाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम साकार होण्याच्या  दिशेने या यशाने देशाला एक पाऊल पुढे नेले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

एक्स वरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:

“भारताचा पहिला मानवी अंतराळ उड्डाण कार्यक्रम, गगनयान साकार करण्याच्या दिशेने हे प्रक्षेपण आपल्याला एक पाऊल जवळ घेऊन जात आहे.  इस्रो मधील आपल्या शास्त्रज्ञांना माझ्या शुभेच्छा."