उत्तर प्रदेशातील लखनौ आणि हरदोई जिल्ह्यांमध्ये उभारलेल्या पीएम मित्र भव्य वस्त्रोद्योग पार्कचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. 

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग आणि वस्त्रोद्योग मंत्री,पीयूष गोयल यांनी आज उत्तर प्रदेशमधील भव्य वस्त्रोद्योग पार्कच्या उद्घाटनाबाबत केलेले ट्विट सामायिक करताना, पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशांमध्ये म्हटले आहे;

“उत्तर प्रदेशमध्ये वस्त्रोद्योगाची समृद्ध परंपरा,मोठी बाजारपेठ आणि ग्राहकवर्ग आहे. हे कष्टकरी विणकर आणि कुशल कामगारांचे माहेरघर आहे.लखनौ आणि हरदोई जिल्ह्यांमध्ये पीएम मित्र भव्य वस्त्रोद्योग पार्कच्या उभारणीचा उत्तर प्रदेशला खूप फायदा होईल.”

“उत्तर प्रदेशातील माझ्या सर्व बंधू-भगिनींसाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे.लखनौ आणि हरदोई येथे पीएम मित्र पार्कचे लोकार्पण होत आहे.या निमित्ताने तुम्हा सर्वांना  हार्दिक शुभेच्छा.”

“1000 पेक्षा अधिक एकरांवर व्याप्त  हे पीएम मित्र पार्क स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याबरोबरच रोजगाराच्या अनेक नवीन संधी उपलब्ध करणार आहे.देशाच्या वस्त्रोद्योग क्षेत्रालाही यामुळे नवे बळ मिळणार आहे.”

 

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation

Media Coverage

Vikas Bhi, Virasat Bhi: How JATAN, AI and Digital Archives are revolutionising India’s cultural heritage preservation
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
भारत छोडो आंदोलनात सहभागी शूर स्वातंत्र्यसैनिकांना पंतप्रधानांकडून आदरांजली
August 09, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनात सहभागी झालेल्या सर्वांचे स्मरण करत भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील त्यांच्या धैर्य आणि दृढ निश्चयाला आदरांजली वाहिली आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या 'भारत छोडो' आंदोलनाच्या हाकेने स्वातंत्र्यलढ्यात नवचैतन्य फुंकले आणि ब्रिटिश राजवटीतून मुक्त होण्याच्या भारतातील जनतेच्या अढळ संकल्पाचे दर्शन घडवले, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी एक्स (X) वर पोस्ट केले:

"ऐतिहासिक 'भारत छोडो' आंदोलनातील सर्व सहभागींचे भावपूर्ण स्मरण. त्यांचे धैर्य प्रत्येक भारतीयासाठी सदैव प्रेरणादायी राहील. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन दिलेला 'भारत छोडो'चा एल्गार आपल्या स्वातंत्र्यलढ्यात नवीन ऊर्जा भरून गेला आणि वसाहतवादी शासनातून मुक्त होण्याच्या आपल्या लोकांच्या अढळ निश्चयाचे त्याने प्रतीक बनले."