पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंध्र प्रदेशातील चित्तूरजवळ आयोजित योगांध्र 2028 कार्यक्रमातील योगप्रेमींच्या उत्साही सहभागाचे कौतुक केले. हा कार्यक्रम निसर्गरम्य चित्तूर - पुलीगुंडू या जोडून  डोंगरमाथा (जुळी शिखरे)  असलेल्या भागामध्ये आयोजित करण्यात आला होता.  जिथे 2000 हून अधिक योगप्रेमी आंतरराष्ट्रीय योग दिन (आयडीवाय) 2025 पर्यंत महिनाभर चालणाऱ्या आंध्र प्रदेशातील कार्यक्रमाचा आरंभ करण्यासाठी जमले होते.

केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी समाज माध्‍यम ‘एक्स’  वर सामायिक केलेल्या पोस्टचा उल्लेख करताना पंतप्रधान म्हणाले;

"योग दिन 2025 बद्दल उत्साह वाढताना पाहून आनंद होत आहे. 

#Yogandhra2025 हा आंध्र प्रदेशातील लोकांचा योग लोकप्रिय करण्यासाठीचा एक प्रशंसनीय प्रयत्न आहे. आंध्र प्रदेशात 21 तारखेला योग दिन साजरा करण्यास मी उत्सुक आहे.

तुम्हा सर्वांना योग दिन साजरा करण्याचे आणि योगाभ्यासाला तुमच्या जीवनाचा नियमित भाग बनवण्याचे मी आवाहन करतो. 

@ncbn"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
PM Modi, Guterres Stress Multipolarity, Need To Reform UN Institutions Including UNSC

Media Coverage

PM Modi, Guterres Stress Multipolarity, Need To Reform UN Institutions Including UNSC
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 14 सप्टेंबर 2026
September 14, 2026

PM Modi Brought the Train to Aizawl and Bharat to the BRICS Table