पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमात देशभरातून विकसित भारत संकल्प यात्रेचे हजारो लाभार्थी सामील झाले. कार्यक्रमात केंद्रीय मंत्री, खासदार, आमदार आणि स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधीही सहभागी झाले होते.
हरियाणाच्या रोहतक येथील शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधीचे लाभार्थी संदीप हे 11 जणांच्या एकत्र कुटुंबात राहतात.
संवादादरम्यान, पंतप्रधानांनी अशा घटना कथन केल्या ज्यात लोकांना थेट त्यांच्या खात्यात पैसे जमा होत असल्याची माहिती नव्हती. अशा लोकांना मिळणाऱ्या मदतीची जाणीव करून दिली. संदीप यांनी पंतप्रधानांना सांगितले की सन्मान निधी म्हणून मिळालेले पैसे खते आणि बियाणे खरेदी करण्यासाठी उपयुक्त असून शेतीला सहाय्यकारक ठरतात.
रेशन वितरणाच्या सुरळीत कामकाजाबाबत पंतप्रधानांना अवगत करण्यात आले. हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या कडक अंमलबजावणीची पंतप्रधानांनी दखल घेतली. गावात ‘मोदींची गॅरंटी’ गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमस्थळी महिलांच्या मोठ्या प्रमाणावरील उपस्थितीची पंतप्रधानांनी दखल घेतली आणि प्राणप्रतिष्ठेसाठी त्यांचे आशीर्वाद घेतले.


