राजधानी दिल्लीत होणाऱ्या 71व्या प्रजासत्ताक दिन संचलनात सहभागी होणाऱ्या 1730 आदिवासी अतिथी, एनसीसी कॅडेटस्, एनएसएस स्वयंसेवक, चित्ररथ कलाकारांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला.

प्रजासत्ताक दिन संचलनात भारताच्या संस्कृतीची झलक जगाला अनुभवायला मिळेल. भारत म्हणजे केवळ भौगोलिक अस्तित्व असलेले क्षेत्र नव्हे. भारत म्हणजे केवळ 130 कोटी जनतेचे निवासस्थान नव्हे तर चैतन्यदायी परंपरांचे एक राष्ट्र आहे, असे पंतप्रधान म्हणाले.

भारत म्हणजे जीवनाच्या शैली, कल्पना आणि विविध तत्वज्ञान जिथे नांदतात असा देश आहे. भारत म्हणजे सर्व धर्म समभाव, भारत म्हणजे सत्याचा विजय, भारत म्हणजे स्वयंपूर्णता, भारत म्हणजे जिथे स्त्री शक्तीची पूजा, भारत म्हणजे भारतीयत्वाच्या सामायिक धाग्यात गुंफलेली विविध फुलं.

आपल्या मूलभूत कर्तव्यांना महत्व देण्याची वेळ आली असून आपण इमानदारीने आपली कर्तव्य पार पाडली तर आपल्या हक्कांसाठी झगडण्याची आवश्यकताच उरणार नाही असे पंतप्रधान म्हणाले.

 

 

Click here to read PM's speech

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Cabinet clears ₹23,731 crore GOBARdhan scheme for compressed biogas

Media Coverage

Cabinet clears ₹23,731 crore GOBARdhan scheme for compressed biogas
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam emphasizing on spirit of selfless service
August 07, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam highlighting the virtue of selfless service and the noble ideal of working for the welfare of others without expecting anything in return:

"किं चन्द्रमाः प्रत्युपकारलिप्सया करोति गोभिः कुमुदावबोधनम्।

स्वभाव एवोन्नतचेतसां सतां परोपकारव्यसनं हि जीवितम्॥"

The Prime Minister posted on X:

किं चन्द्रमाः प्रत्युपकारलिप्सया करोति गोभिः कुमुदावबोधनम्।

स्वभाव एवोन्नतचेतसां सतां परोपकारव्यसनं हि जीवितम्॥