पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जून 2025 रोजी कॅनडातील कानानस्किस येथे झालेल्या जी 7 शिखर परिषदेत दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईझ इनासियो लुला दा सिल्वा यांच्याशी सार्थक आणि मनापासून संवाद साधला. त्यांनी ग्लोबल साऊथचे सक्रिय समर्थन करण्याप्रति भारताच्या अतूट वचनबद्धतेला दुजोरा दिला.
एक्स वरील ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांच्या पोस्टला उत्तर देताना, मोदी यांनी लिहिले:
"दोन प्रिय मित्र, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष रामाफोसा आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला यांच्याबरोबर मनमोकळा संवाद. ग्लोबल साऊथसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोलण्याविषयी, आमच्या वचनबद्धतेत आम्ही अविचल आहोत. एक चांगले राष्ट्र उभारण्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्यास आम्ही तितकेच कटिबद्ध आहोत."
O Sul Global se faz presente no G7. Encontro com @CyrilRamaphosa 🇿🇦 e @narendramodi 🇮🇳
— Lula (@LulaOficial) June 17, 2025
📸 @ricardostuckert pic.twitter.com/puPsEMWix2


