शेअर करा
 
Comments
“या वर्षाच्या पहिल्या महिन्यातल्या, पहिल्याच सप्ताहात, भारत 150 कोटी लसी- दीड अब्ज लसींच्या मात्रा देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करणार”
“एका वर्षांपेक्षा कमी काळात 150 कोटी मात्रा देण्याचे उद्दिष्ट गाठणे ही महत्त्वाची कामगिरी असून, देशाच्या नव्या इच्छाशक्तिचे प्रतीक आहे.”
“आयुष्मान भारत योजना, परवडणारी आणि एकात्मिक आरोग्य योजना म्हणून जागतिक स्तरावर एक आदर्श योजना म्हणून सिद्ध होत आहे.”
“पीएम- जेएवाय योजनेअंतर्गत, देशभरातील दोन कोटी 60 लाखांपेक्षा अधिक रुग्णांना मोफत उपचार मिळाले आहेत.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज कोलकाता येथील चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेच्या दुसऱ्या संकुलाचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन झाले. 

या कार्यक्रमाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय, डॉ सुभाष सरकार, शंतनू ठाकूर, जॉन बरला आणि निशिथ प्रामाणिक उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पंतप्रधान मोदी म्हणाले की, या परिसरामुळे, पश्चिम बंगालच्या लोकांना- विशेषतः गरीब आणि मध्यमवर्गीयांना उत्तम दर्जाच्या आधुनिक वैद्यकीय सुविधा परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतील.

“देशातील प्रत्येक नागरिकाला उत्तमोत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात या आमच्या संकल्पपूर्तीसाठी आम्ही आज एक आणखी मोठे पाऊल उचलले आहे.” असे पंतप्रधान म्हणाले.   

आपण 2022 या वर्षाची सुरुवात  15-18 वर्षे वयोगटातील मुलांसाठीच्या लसीकरणाने केली  आहे. आणि त्याचवेळी  पहिल्या महिन्याच्या पहिल्याच सप्ताहात, आपण लसींच्या 150 कोटी मात्रा देण्याचा ऐतिहासिक टप्पा पार करतो आहोत, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. एका वर्षांपेक्षा कमी काळात लसीच्या 150 कोटी मात्रा देण्याचे उद्दिष्ट गाठणे ही महत्त्वाची कामगिरी असून, देशाच्या प्रबळ इच्छाशक्तीचे हे  प्रतीक आहे. यातून देशाचा नवा आत्मविश्वास,आत्मनिर्भरता आणि अभिमान व्यक्त होतो, असेही त्यांनी सांगितले. देशात सध्या ओमायक्रॉन मुळे कोविड रुग्णसंख्या वाढते आहे, अशावेळी 150 कोटी लसींच्या मात्राना अधिकच महत्व प्राप्त झाले आहे, असेही त्यांनी सांगितले.

आज, देशातील 90 टक्के प्रौढ जनतेला लसीची किमान एक मात्रा मिळाली आहे. केवळ पांच दिवसांत, दीड कोटींपेक्षा अधिक कुमारवयीन मुलांनाही लसींच्या मात्रा देण्यात आल्या. हे देशातील प्रत्येक सरकारचे आणि देशाचे यश आहे, असे पंतप्रधान म्हणाले. त्यांनी विशेषत: देशातले वैज्ञानिक आणि लस उत्पादकांसह, आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे आभार मानले.

केंद्र सरकार तर्फे आतापर्यंत पश्चिम बंगाल सरकारला  कोविड-19 लसीच्या 11 कोटी मात्रा मोफत  देण्यात आल्या आहेत. 1,500 व्हेंटिलेटर्स, 9,000 ऑक्सिजन सिलेंडर्स पाठवले असून 49 पीएसए प्लँट पश्चिम बंगालमध्ये कार्यरत आहेत, असे त्यांनी सांगितले.  

देशातील आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन आणण्यासाठी, प्रतिबंधात्मक आरोग्यसुविधा, परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा यासाठी मिशन मोडवर अभियान सुरु आहेत. औषधे आणि इतर वस्तूंचा पुरवठा याची गती वाढवण्यात आली आहे. योग, आयुर्वेद, फिट इंडिया अभियान, सार्वत्रिक लसीकरण अशा उपाययोजनांमुळे प्रतिबंधात्मक आरोग्यव्यवस्था मजबूत होत आहे, असे ते म्हणाले.

त्याच वेळी, स्वच्छ भारत मिशन आणि हर घर जल योजनेमुळेही आरोग्य सुधारणेला बळ मिळत आहे, असे त्यांनी सांगितले.

गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना कर्करोग झाल्यास, त्याच्या महागड्या उपचारांमुळे गरिबांच्या मनात भीती निर्माण होते असे पंतप्रधान म्हणाले.

आजारांची कारणे आणि परिस्थितीमुळे पुन्हा होणारे आजार या  दुष्टचक्रातून गरिबांची सुटका करण्यासाठी देशात, स्वस्त आणि सर्वांना उपलब्ध होईल अशी उपचार सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जात आहे, असेही मोदी यांनी सांगितले. गेल्या काही वर्षात,कर्करोगावरील उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांच्या किमती लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्या आहेत. देशभरात, आठ हजार पेक्षा अधिक जन औषधी केंद्रांमध्ये औषधे आणि सर्जिकल उपकरणे अतिशय कमी दरात उपलब्ध होत आहेत. या केंद्रांमध्ये कर्करोगासाठी लागणारी 50 पेक्षा अधिक औषधं अतिशय कमी किमतीत उपलब्ध आहेत.

पंतप्रधान म्हणाले की सरकार रुग्णांच्या गरजांप्रती संवेदनशील आहे आणि 500 हून अधिक औषधांच्या किमतीचे  नियमन केल्याने वर्षाला 3000 कोटींहून अधिक रुपयांची बचत होत आहे. कोरोनरी स्टेंटच्या निर्धारित किमतींमुळे हृदयरोगी दरवर्षी 4500 कोटी रुपयांहून अधिक बचत करत आहेत, गुडघा प्रत्यारोपणाच्या खर्चात घट झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दरवर्षी त्यांचे 1500 कोटी रुपये वाचवण्यात मदत होत आहे. प्रधानमंत्री राष्ट्रीय डायलिसिस कार्यक्रमांतर्गत 12 लाख गरीब रुग्णांना मोफत डायलिसिस सुविधा मिळाल्याची माहिती पंतप्रधानांनी दिली.

पंतप्रधान म्हणाले की, आज आयुष्मान भारत योजना परवडणाऱ्या आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेच्या बाबतीत जागतिक दर्जाची बनत आहे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजने अंतर्गत, देशभरातील रुग्णालयांमध्ये 2 कोटी 60 लाखांहून अधिक रुग्णांनी मोफत उपचार घेतले आहेत. या योजनेअभावी रुग्णांचे 50 ते 60 हजार कोटी रुपये खर्च झाले असते, असा अंदाज आहे. 17 लाखांहून अधिक कर्करोग झालेल्या व्यक्तींना आयुष्मान भारत योजनेंतर्गत लाभ झाला आहे. ही योजना कर्करोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाबा सारख्या आजारांची नियमित तपासणी करून गंभीर आजारांचे लवकर निदान आणि लवकर उपचारांना प्रोत्साहन देते. या मोहिमेत नव्याने तयार होणारी आरोग्य आणि स्वास्थ्य केंद्रे मदत करत आहेत. पश्चिम बंगालमध्येही अशी  5 हजारांहून अधिक केंद्रे तयार करण्यात आली आहेत. देशात 15 कोटींहून अधिक लोकांची मुखाच्या, गर्भाशयाच्या आणि स्तनाच्या कर्करोगासाठी तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली.

पंतप्रधान म्हणाले की, 2014 सालापर्यंत देशात पदवी आणि पदव्युत्तर वैद्यकीय जागांची संख्या सुमारे 90,000 होती. गेल्या 7 वर्षात त्यांच्यात 60,000 नवीन जागांची भर पडली आहे. 2014 मध्ये आमच्याकडे फक्त 6 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था होत्या आणि आज देश 22 अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांच्या मजबूत नेटवर्ककडे वाटचाल करत आहे. भारतातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय असेल अशी व्यवस्था करण्याचे काम सुरू आहे. कर्करोग सेवा पायाभूत सुविधेला 19 राज्य कर्करोग संस्थांद्वारे चालना मिळेल, 20 टर्शरी केअर कर्करोग संस्थांना मंजुरी देण्यात आली आहे आणि 30 हून अधिक संस्थांसाठी काम सुरू आहे. त्याचप्रमाणे आयुष्मान भारत डिजिटल आरोग्य अभियान आणि आयुष्मान भारत पायाभूत सुविधा अभियान देशाच्या आरोग्य क्षेत्राला आधुनिक स्वरूप देईल, असेही ते म्हणाले.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत सर्व खबरदारी घेण्याच्या आवाहनाचा पुनरुच्चार करून पंतप्रधानांनी भाषणाचा समारोप केला.

CNCI अर्थात चित्तरंजन राष्ट्रीय कर्करोग संस्थेचे दुसरे संकुल देशाच्या सर्व भागात आरोग्य सुविधांचा विस्तार आणि सुधारणा करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार बांधण्यात आले आहे. CNCI ला कर्करोगाच्या रूग्णांचा मोठा भार पडत होता आणि काही काळापासून विस्ताराची गरज भासत होती. ही गरज दुसऱ्या संकुलाच्या माध्यमातून पूर्ण केली जाणार आहे.

CNCI चे दुसरे संकुल 540 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून बांधले गेले आहे, त्यापैकी सुमारे 400 कोटी रुपये केंद्र सरकार आणि उर्वरित पश्चिम बंगाल सरकारने 75:25 च्या प्रमाणात प्रदान केले आहेत. हे संकुल म्हणजे कर्करोगाचे निदान, प्रकार, उपचार आणि काळजी यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधांसह 460 खाटांचे सर्वसमावेशक कर्करोग केंद्र युनिट आहे. हे संकुल न्यूक्लियर मेडिसिन (पीईटी), 3.0 टेस्ला एमआरआय, 128 स्लाइस सीटी स्कॅनर, रेडिओन्यूक्लाइड थेरपी युनिट, एंडोस्कोपी सूट, आधुनिक ब्रेकीथेरपी युनिट इत्यादी आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. हे संकुल विशेषत: देशाच्या पूर्व आणि ईशान्येकडील भागातील कर्करोगाच्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी एक प्रगत कर्करोग संशोधन सुविधा म्हणून देखील काम करेल आणि सर्वसमावेशक सुविधा प्रदान करेल.

संपूर्ण भाषण वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Explore More
76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन

लोकप्रिय भाषण

76 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरुन देशवासियांना केलेले संबोधन
India's urban unemployment rate falls to 6.8% in Q4, shows govt data

Media Coverage

India's urban unemployment rate falls to 6.8% in Q4, shows govt data
...

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister Narendra Modi shares website link showcasing development journey under the Government
May 30, 2023
शेअर करा
 
Comments

The Prime Minister has shared the website link showcasing development journey under the Government in the past 9 years. Shri Modi has invited everyone to visit the website and witness how people have benefited from various Government schemes.

The Prime Minister tweeted:

"9 years of unwavering dedication to the nation’s growth.

I invite everyone to visit this site nm-4.com/9yrsofseva to get a glimpse of our development journey. It also gives an opportunity to highlight how people have benefited from various Government schemes. #9YearsOfSeva "