पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 सप्टेंबर 2023 रोजी दिल्लीत जी 20 शिखर परिषदेच्या निमित्ताने कोमोरोसचे राष्ट्रपती अझाली असौमानी यांची भेट घेतली.

आफ्रिकन संघाला जी 20 चा कायमस्वरूपी सदस्य बनवण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आणि प्रयत्नांबद्दल राष्ट्रपती असौमानी यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. भारताची भूमिका आणि आफ्रिकेशी असलेले संबंध लक्षात घेता भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात हे घडले याबद्दल त्यांनी विशेष आनंद व्यक्त केला. यामुळे भारत-कोमोरोस संबंधांनाही चालना मिळेल असे त्यांनी नमूद केले. भारताच्या जी 20 अध्यक्षतेच्या यशाबद्दल त्यांनी पंतप्रधानांचे अभिनंदन केले.

जी 20 मध्ये सामील झाल्याबद्दल आफ्रिकन संघ आणि कोमोरोसचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले आणि ग्लोबल साऊथचा आवाज पोहचवण्यासाठी भारताकडून केले जात असलेले प्रयत्न अधोरेखित केले आणि जानेवारी 2023 मध्ये भारताने आयोजित केलेल्या व्हॉइस ऑफ ग्लोबल शिखर परिषदेची आठवण करून दिली.

दोन्ही नेत्यांना त्यांच्या द्विपक्षीय भागीदारीबाबत चर्चा करण्याचीही संधी मिळाली. त्यांनी सध्या सुरू असलेल्या अनेक उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले आणि सागरी सुरक्षा, क्षमता निर्मिती आणि विकास भागीदारी यासारख्या क्षेत्रातील सहकार्याच्या संधींवर चर्चा केली.

 

Explore More
प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये

लोकप्रिय भाषण

प्रत्येक भारतीयाचं रक्त तापलं आहेः पंतप्रधान मोदी मन की बातमध्ये
I-T refunds up 6x in 11 years at ₹4.8L crore

Media Coverage

I-T refunds up 6x in 11 years at ₹4.8L crore
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 जुलै 2025
July 13, 2025

From Spiritual Revival to Tech Independence India’s Transformation Under PM Modi