PM emphasizes the remarkable contributions of Yuva Shakti across diverse sectors and their growing impact on the global stage

युवा नेतृत्वाखालील विकासाला चालना देण्यासाठी सरकार ठामपणे कार्यरत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितले.  गेल्या 12 वर्षांतील एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे भारतातील युवकांनी आपल्या आकांक्षांचा आत्मविश्वासाने पाठपुरावा करत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केल्याचे त्यांनी नमूद केले. स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया आणि अटल इनोव्हेशन मिशन यांसारख्या उपक्रमांमुळे नवोन्मेष, उद्योजकता आणि उद्योगशीलतेला प्रोत्साहन देणारी सक्षम परिसंस्था विकसित झाली आहे, असे मोदी यांनी सांगितले.  आज भारत हा जगातील आघाडीच्या स्टार्टअप केंद्रांपैकी एक बनला असून, या यशोगाथांपैकी अनेक आपल्या युवा शक्तीकडून लिहिल्या जात आहेत. विशेष म्हणजे, या यशोगाथा लहान शहरे आणि गावांमधूनही घडत असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.
भारतातील युवक विज्ञान आणि तंत्रज्ञान, उत्पादन, अवकाश, सेमीकंडक्टर तसेच ड्रोन यांसारख्या विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहेत, असे पंतप्रधानांनी नमूद केले. देशाचे आणि जगाचे भवितव्य घडविणाऱ्या क्षेत्रांमध्ये भारतीय युवक महत्त्वपूर्ण योगदान देत असल्याचे पाहून समाधान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. क्रीडा क्षेत्रातही आपल्या युवकांनी देशाला मोठा गौरव मिळवून दिला असून, विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्याने राष्ट्रीय अभिमान वाढविला आहे , असे  मोदी म्हणाले. अधिक सक्षम क्रीडा परिसंस्था, सुधारित पायाभूत सुविधा आणि खेळाडूंना वाढता पाठिंबा यामुळे युवा प्रतिभेसाठी नवीन संधी निर्माण होत असून, त्यांना क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पंतप्रधानांनी एक्सवरील संदेशांचा मालिकेत सांगितले की,
एनडीए सरकार युवा नेतृत्वाखालील विकासासाठी ठामपणे कार्यरत आहे. गेल्या 12 वर्षांतील एक ठळक वैशिष्ट्य म्हणजे भारतातील युवकांनी आपल्या आकांक्षांचा आत्मविश्वासाने पाठपुरावा केला आहे.  स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया, स्किल इंडिया आणि अटल इनोव्हेशन मिशन यांसारख्या उपक्रमांमुळे नवोन्मेष, उद्योजकता आणि उद्योगशीलतेला चालना देणारी परिसंस्था विकसित झाली आहे.
आज भारत हा जगातील आघाडीच्या स्टार्टअप केंद्रांपैकी एक असून, या यशोगाथांपैकी अनेक आपल्या युवा शक्तीकडून लिहिल्या जात आहेत. विशेष म्हणजे, या यशोगाथा लहान शहरे आणि गावांमधूनही घडत आहेत.
#12YearsOfYuvaShakti

 

 

आपले युवक विज्ञान आणि तंत्रज्ञान, उत्पादन, अवकाश, सेमीकंडक्टर आणि ड्रोन यांसारख्या विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवत आहेत. देशाचे आणि जगाचे भवितव्य घडविणाऱ्या क्षेत्रांमध्ये भारतीय युवक योगदान देत आहेत, हे पाहून समाधान वाटते. क्रीडा क्षेत्रातही आपल्या युवकांनी देशाला मोठा गौरव मिळवून दिला आहे. विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये युवा भारतीय खेळाडूंनी सातत्याने राष्ट्रीय अभिमान वाढवला आहे. त्याचबरोबर अधिक सक्षम क्रीडा परिसंस्था, सुधारित पायाभूत सुविधा आणि खेळाडूंना मिळणारा वाढता पाठिंबा यामुळे युवा प्रतिभेसाठी नवीन संधी निर्माण होत असून, त्यांना क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
12YearsOfYuvaShakti"

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
How PLI schemes, design in India and manufacturing excellence are transforming the architectural lighting industry

Media Coverage

How PLI schemes, design in India and manufacturing excellence are transforming the architectural lighting industry
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 28 जुलै 2026
July 28, 2026

From Factories to Space & High-Speed Rail: How PM Modi’s Vision is Rewiring India’s Future