पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील भागीदारी हा एक 'ऐतिहासिक क्षण' असल्याचे नमूद करून भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराची प्रशंसा केली.
ते म्हणाले की, हा करार दोन्ही देशांमधील विकास भागीदारीला अभूतपूर्व गती देईल. हा करार दोन्ही राष्ट्रांना परस्परांशी जोडून ठेवणाऱ्या गाढ विश्वास, सामायिक मूल्ये आणि महत्त्वाकांक्षा यांचे प्रतिबिंब असल्याचेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधानांनी नमूद केले की, या मुक्त व्यापार कराराचा शेतकरी, तरुण, महिला, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, कारागीर, स्टार्ट-अप्स, विद्यार्थी आणि नवप्रवर्तकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल. त्यांनी पुढे सांगितले की, हा करार विकासाच्या नवीन वाटा खुल्या करेल, संधी निर्माण करेल आणि विविध क्षेत्रांमधील परस्पर समन्वय अधिक दृढ करेल.
पंतप्रधान मोदी यांनी यावरही प्रकाश टाकला की, न्यूझीलंडने केलेली 20 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची वचनबद्धता कृषी, उत्पादन, नवप्रवर्तन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील सहकार्य अधिक बळकट करेल. यामुळे दोन्ही देशांसाठी अधिक समृद्ध आणि गतिमान भविष्याचा मार्ग प्रशस्त होईल.
Today marks a landmark moment in the India-New Zealand partnership!
— Narendra Modi (@narendramodi) April 27, 2026
I am delighted that the India-New Zealand FTA signed today will add unprecedented momentum to our developmental partnership. It reflects the deep trust, shared values and ambition that bind our two nations.… https://t.co/WBHn4gb1yB
पंतप्रधानांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावर पोस्ट केले आहे की :
“आजचा दिवस भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील भागीदारीमधील एक ऐतिहासिक क्षण आहे !
मला अत्यंत आनंद होत आहे की, आज स्वाक्षरी करण्यात आलेला भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार करार आमच्या विकास भागीदारीला अभूतपूर्व गती देईल. हा करार दोन्ही राष्ट्रांना परस्परांशी जोडून ठेवणाऱ्या गाढ विश्वास, सामायिक मूल्ये आणि महत्त्वाकांक्षा यांचे प्रतिबिंब आहे.
या कराराचा आमचे शेतकरी, तरुण, महिला, एमएसएमई, कारागीर, स्टार्ट-अप्स, विद्यार्थी आणि नवप्रवर्तकांना मोठ्या प्रमाणावर लाभ होईल. हा करार विकासाच्या नवीन वाटा खुल्या करेल, संधी निर्माण करेल आणि विविध क्षेत्रांमधील आमचा परस्पर समन्वय अधिक दृढ करेल.
न्यूझीलंडने केलेली 20 अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची वचनबद्धता कृषी, उत्पादन, नवप्रवर्तन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रांमधील आमचे सहकार्य अधिक बळकट करेल. त्यामुळे दोन्ही देशांसाठी अधिक समृद्ध आणि गतिमान भविष्याचा मार्ग प्रशस्त होईल.
@chrisluxonmp”
In a message, PM @narendramodi said that the India-New Zealand FTA marks a major milestone towards deeper global engagement and shared prosperity.
— PMO India (@PMOIndia) April 27, 2026
It strengthens economic ties between two vibrant democracies, unlocking opportunities for farmers, artisans, youth, entrepreneurs,… pic.twitter.com/zglAERVVcj


