पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाच्या सर्व अधिकारी -जवान - कर्मचाऱ्यांना आजच्या नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आपले नौदल म्हणजेच अद्वितीय साहस आणि दृढनिश्चयाचे मूर्तिमंत उदाहरण आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. आपल्या सागरी सीमा आणि सागरी कार्यक्षेत्राचे ते रक्षणकर्ते आहेत. मोदी म्हणाले, “आय एन एस विक्रांत वर नौदलाच्या जवानांबरोबर मी यावर्षी साजरी केलेली दिवाळी केवळ अविस्मरणीय आहे. भारतीय नौदलाला त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!”

पंतप्रधानांनी एक्स वरील आपल्या संदेशात लिहिले आहे,

“भारतीय नौदलाच्या सर्व अधिकारी-जवान- कर्मचाऱ्यांना आजच्या नौदल दिनानिमित्त शुभेच्छा. आपले नौदल म्हणजेच अद्वितीय साहस आणि दृढनिश्चयाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. आपल्या सागरी सीमा आणि सागरी कार्यक्षेत्राचे ते रक्षणकर्ते आहेत. गेल्या काही वर्षांत आपल्या नौदलाने आत्मनिर्भरता आणि आधुनिकतेवर लक्ष केंद्रित केले असून आपल्या सुरक्षा व्यवस्थेत त्यामुळे खूप सुधारणा झाली आहे.

आय एन एस विक्रांत वर नौदलाच्या जवानांबरोबर मी यावर्षी साजरी केलेली दिवाळी केवळ अविस्मरणीय होती. भारतीय नौदलाला त्यांच्या पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा!”

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Eway bills rise 7.7% to 139.08 mn in August, third highest on record

Media Coverage

Eway bills rise 7.7% to 139.08 mn in August, third highest on record
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 4 सप्टेंबर 2026
September 04, 2026

Make in India, Power India, Play for India: Multi-Sector Momentum Under PM Modi’s Leadership