पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) स्थापना दिनानिमित्त सर्व जवानांना शुभेच्छा दिल्या आहेत. अत्यंत कठीण परिस्थितीतही केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांनी कर्तव्यनिष्ठा, धैर्य व दृढ वचनबद्धतेचा ठसा उमटवला आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
‘एक्स' या सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की, केंद्रीय राखीव पोलीस दल- (सीआरपीएफ)च्या स्थापना दिनानिमित्त सर्व जवानांना शुभेच्छा. देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंदर्भातील आव्हानात्मक परिस्थितीत सीआरपीएफने अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अत्यंत कठीण प्रसंगी देखील कर्तव्य, धैर्य व दृढ वचनबद्धतेचा ठसा उमटवला आहे. मानवी संकटांवर मात करण्यातही या बलाचे योगदान उल्लेखनीय आहे.
@crpfindia
Raising Day wishes to all CRPF personnel. This force has played a vital role in our security apparatus, especially in challenging aspects relating to internal security. CRPF personnel have made a mark for their duty, courage and steadfast commitment in the most testing of…
— Narendra Modi (@narendramodi) July 27, 2025


