पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा दिनाच्या निमित्ताने हरियाणाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हरियाणाने आपल्या शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमांद्वारे, सैनिकांच्या अतुलनीय शौर्याद्वारे आणि तरुणांच्या उल्लेखनीय कामगिरीद्वारे नेहमीच देशासाठी प्रेरणास्थान म्हणून कार्य केले आहे, असे मोदी म्हणाले. त्यांनी राज्यातील सर्व नागरिकांना आनंदी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. राज्य विकासाच्या मार्गावर वेगाने प्रगती करत आहे, असे ते म्हणाले.
एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात पंतप्रधान म्हणाले की,
हरियाणा दिनाच्या निमित्ताने राज्यातील सर्व नागरिकांना मनःपूर्वक शुभेच्छा. ही ऐतिहासिक भूमी आपल्या शेतकरी बांधवांच्या अथक परिश्रमांमुळे, सैनिकांच्या अतुलनीय शौर्यामुळे आणि तरुणांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे देशासाठी नेहमीच एक आदर्श राहिली आहे. विकासाच्या मार्गावर वेगाने वाटचाल करणाऱ्या या राज्याच्या या विशेष प्रसंगी मी सर्वांच्या आनंदी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
हरियाणा दिवस के अवसर पर राज्य के सभी निवासियों को बहुत-बहुत बधाई। यह ऐतिहासिक धरती हमारे किसान भाई-बहनों के अथक परिश्रम, जवानों के अतुलनीय पराक्रम और युवाओं के अद्भुत प्रदर्शन से देशभर के लिए एक मिसाल रही है। प्रगति के पथ पर तेजी से आगे बढ़ रहे इस प्रदेश के विशेष अवसर पर मैं हर…
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2025


