पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडच्या 25 व्या स्थापना दिनानिमित्त तेथिल नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. निसर्ग आणि संस्कृतीला समर्पित छत्तीसगड राज्य प्रगतीचे नवे मानदंड प्रस्थापित करत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. पूर्वी नक्षलवादाने प्रभावित असलेल्या अनेक भागांमध्ये आता विकासाची स्पर्धा सुरू आहे, असे त्यांनी नमूद केले. छत्तीसगडमधील कष्टाळू आणि कुशाग्र लोकांच्या परिश्रम आणि उद्योगशीलतेमुळे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यात हे राज्य महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला.
एक्स या सामाजिक माध्यमावरील संदेशात मोदी म्हणाले की,
छत्तीसगडमधील माझ्या सर्व बांधवांना राज्याच्या स्थापना दिनाच्या 25 व्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. निसर्ग आणि संस्कृतीला समर्पित हे राज्य आज प्रगतीचे नवनवे मानक निर्माण करत आहे. कधीकाळी नक्षलवादाने प्रभावित असलेले अनेक भाग आता विकासाच्या स्पर्धेत उतरले आहेत. मला खात्री आहे की, येथील मेहनती आणि कुशल लोकांच्या जिद्दीने आणि उद्योगामुळे आपले हे राज्य विकसित भारताच्या दृष्टिकोनास साकारण्यात निर्णायक भूमिका निभावेल.
छत्तीसगढ़ के अपने सभी भाई-बहनों को राज्य के स्थापना दिवस की 25वीं वर्षगांठ की अनेकानेक शुभकामनाएं। प्रकृति और संस्कृति को समर्पित यह प्रदेश आज प्रगति के नित-नए मानदंड गढ़ने में जुटा है। कभी नक्सलवाद से प्रभावित रहे यहां के कई इलाके आज विकास की प्रतिस्पर्धा कर रहे हैं। मुझे भरोसा…
— Narendra Modi (@narendramodi) November 1, 2025


