पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान महावीर जन्म कल्याणक निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. भगवान महावीरांचे जीवन व शिकवण सदैव सत्य, अहिंसा व दया यांचा मार्ग उजळवत राहील, असे मोदी यांनी म्हटले आहे.

“त्यांचे आदर्श वैचारिक उन्नती साधणारे असून ते आजच्या जगालाही लागू पडतात. समानता व ममता याविषयीचे त्यांचे विचार आपल्याला आपल्या सामाजिक जबाबदारीची आठवण करुन देतात,” असे विचार पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केले आहेत.

पंतप्रधान एक्स माध्यमावर लिहितात,

“भगवान महावीर जन्म कल्याणकच्या पवित्र दिनानिमित्त शुभेच्छा! भगवान महावीरांची शिकवण व त्यांचे जीवन सत्य, अहिंसा आणि दयेचा मार्ग सदैव उजळवत राहतील. त्यांचे विचार आध्यात्मिक उन्नती साधणारे असून आजच्या जगातही ते अत्यंत समर्पक ठरतात. समानता व ममता याबाबतची त्यांची शिकवण आपल्याला आपल्या सामाजिक जबाबदारीची जाणीव करुन देते.”  

 

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
‘Shortcuts will cut you short’: PM Modi’s message for youngsters at former President Kovind’s autobiography launch

Media Coverage

‘Shortcuts will cut you short’: PM Modi’s message for youngsters at former President Kovind’s autobiography launch
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
सोशल मीडिया कॉर्नर 13 ऑगस्ट 2026
August 13, 2026

Aatmanirbhar in Motion: Solar Homes, Made-in-India Containers, Record Exports & a Rising Global Footprint Under the Leadership of PM Modi