पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातल्या भिवंडी इथे इमारत कोसळून झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रातल्या भिवंडी इथली इमारत दुर्घटना दुःखदायी असून मृतांच्या कुटुंबियाप्रती शोकभावना व्यक्त करत असल्याचे पंतप्रधानांनी ट्वीटरवरच्या संदेशात म्हटले आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतानाच मदत आणि बचाव कार्य सुरु असून बाधितांना सर्वतोपरी सहाय्य पुरवले जात असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
Saddened by the building collapse in Bhiwandi, Maharashtra. Condolences to the bereaved families. Praying for a quick recovery of those injured. Rescue operations are underway and all possible assistance is being provided to the affected.
— Narendra Modi (@narendramodi) September 21, 2020


