राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपुलकीने दिलेल्या शुभेच्छा तसेच त्यांनी काढलेल्या कौतुकोद्गारांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांचे आभार व्यक्त केले. मागील काही वर्षांत जे काही यश साध्य झाले आहे, ते भारतीय जनतेच्या सामूहिक प्रयत्नांचे आणि त्यांच्या आकांक्षांचे फलित असल्याचे पंतप्रधानांनी नमूद केले.

140 कोटी भारतीयांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच आपली सर्वात मोठी ताकद आणि प्रेरणा असल्याचे मोदी यांनी नमूद केले. राष्ट्रपतींनी 'पीएम-जनमन' आणि 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान' यांचा उल्लेख केल्याबद्दल  आपल्याला विशेष समाधान वाटत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले आहे. 'अंत्योदय'च्या खऱ्या भावनेनुसार विकासाचे लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचतील, हे सुनिश्चित करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

'एक्स' समाजमाध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात :

"राष्ट्रपती जी,

आपण दिलेल्या शुभेच्छा आणि  व्यक्त केलेल्या कौतुकोद्गारांबद्दल मी आपला आभारी आहे. गेल्या काही वर्षांत जे यश साध्य झाले आहे, ते भारतातील जनतेचे सामूहिक प्रयत्न आणि त्यांच्या आकांक्षांचे फलित आहे. 140 कोटी भारतीयांचे प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी सर्वात मोठी ताकद आणि प्रेरणा आहे. आपण 'पीएम-जनमन' आणि 'धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियाना'चा उल्लेख केला, याचा मला विशेष आनंद आहे. 'अंत्योदया'च्या खऱ्या भावनेनुसार विकासाचा लाभ समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे."

@rashtrapatibhvn"

Explore More
अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण

लोकप्रिय भाषण

अयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिर ध्वजारोहण उत्सवात पंतप्रधानांनी केलेले भाषण
Western freight corridor goes all the way, to cut transit time 60%

Media Coverage

Western freight corridor goes all the way, to cut transit time 60%
NM on the go

Nm on the go

Always be the first to hear from the PM. Get the App Now!
...
Prime Minister shares Sanskrit Subhashitam highlighting the value and transformative power of knowledge
September 09, 2026

The Prime Minister, Shri Narendra Modi, shared a Sanskrit Subhashitam highlighting that wisdom teaches the art of living in harmony with society. He said that knowledge imparts wisdom and prosperity, fills the heart with joy and enhances one’s dignity.

The Prime Minister shared a Sanskrit Subhashitam-

“उपदिशति लोकवृत्तं वितरति वित्तं विनोदयति चित्तम्।

उत्तम्भयति महत्त्वं विद्या हृद्या सुराजसेवेव॥”

The Subhashitam conveys that wisdom teaches the art of living in harmony with society. It grants knowledge and prosperity, fills the heart with joy, and raises one's dignity. Thus, wisdom is as precious as service to righteous governance, beloved by the heart, and a force that uplifts life.

The Prime Minister wrote on X;

“उपदिशति लोकवृत्तं वितरति वित्तं विनोदयति चित्तम्।

उत्तम्भयति महत्त्वं विद्या हृद्या सुराजसेवेव॥”