पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज, सीएमए सीजीएम कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी प्रमुख, रॉडॉल्फ सादे यांच्यासोबत सागरी दळणवळण, जागतिक जहाज वाहतूक ट्रेंड्स आणि भारतात अत्यंत वेगाने विकसित होत असलेल्या सागरी क्षेत्रातील उदयोन्मुख संधी अशा विषयांवर अत्यंत फलदायी चर्चा झाली.
जहाजबांधणी क्षेत्र, कंटेनर उत्पादन, डिजिटल सागरी नवोन्मेष, लॉजिस्टिक्स आणि कौशल्य विकास अशा विविध विषयांवरील सहकार्य अधिक व्यापक करण्याच्या मार्गांवरही यावेळी चर्चा झाली, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.
भारतात विस्तारत जाणाऱ्या बंदर पायाभूत सुविधा, सागरी क्षेत्रातील जागतिक उद्योजकांसाठी, अनेक आश्वासक संधीची दारे उघडत आहेत, असे पंतप्रधानांनी यावेळी नमूद केले.
पंतप्रधानांनी एक्स वरच्या पोस्टमध्ये म्हटले आहे;
“सीएमए सीजीएम कंपनीचे अध्यक्ष आणि कार्यकारी प्रमुख, रॉडॉल्फ सादे यांच्यासोबत सागरी दळणवळण, जागतिक जहाज वाहतूक ट्रेंड्स आणि भारतात अत्यंत वेगाने विकसित होत असलेल्या सागरी क्षेत्रातील उदयोन्मुख संधी अशा विषयांवर अत्यंत फलदायी चर्चा झाली.
जहाजबांधणी क्षेत्र, कंटेनर उत्पादन, डिजिटल सागरी नवोन्मेष, लॉजिस्टिक्स आणि कौशल्य विकास अशा विविध विषयांवरील सहकार्य अधिक व्यापक करण्याच्या मार्गांवरही चर्चा केली.
भारतात विस्तारत जाणाऱ्या बंदर पायाभूत सुविधा, सागरी क्षेत्रातील जागतिक उद्योजकांसाठी, अनेक आश्वासक संधींची दारे उघडत आहेत.” @cmacgm”
Had a fruitful discussion with Mr. Rodolphe Saadé of CMA CGM on maritime connectivity, global shipping trends and emerging opportunities in India’s rapidly growing maritime sector.
— Narendra Modi (@narendramodi) June 18, 2026
Discussed avenues for greater collaboration in shipbuilding, container manufacturing, digital… pic.twitter.com/k3vrCH3IiD


