हांगझो येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या आशियाई क्रीडास्पर्धेत पुरूष दुहेरी बॅडमिंटन SH6 प्रकारात कांस्य पदक जिंकल्याबद्दल शिवराजन आणि कृष्णा नागर यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

त्यांनी संघाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X  समाज माध्यमावर म्हटले आहे:

"पॅरा बॅडमिंटन पुरुष दुहेरी SH6 स्पर्धेत कांस्यपदक जिंकून केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल  शिवराजन आणि कृष्णा नागर यांचे अभिनंदन. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.”